शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

स्नेहलता राणे यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार 

By सुधीर राणे | Updated: February 28, 2023 16:26 IST

स्नेहलता या आपल्या शिक्षकी पेशात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असतात.

कणकवली: वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी येथील जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक शाळा नंबर १ च्या पदवीधर शिक्षिका स्नेहलता जगदीश राणे  यांना महाराष्ट्र राज्य शासनाकडून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले' राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२१-२२  जाहीर झाला होता.

त्यांना हा पुरस्कार  मुंबई, बांद्रा येथील रंग शारदा सभागृह येथे राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास विभाग, महिला व बालविकास विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार कपिल पाटील तसेच अधिकारी व प्रा.जगदीश राणे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात. हे  पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने संबोधिले जातात.

सन २०२१-२२ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी कणकवली तालुक्यातील वाघेरी गावच्या मूळ रहिवासी व जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा सांगुळवाडी नं. १ च्या पदवीधर शिक्षिका स्नेहलता राणे यांना हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. स्नेहलता या आपल्या शिक्षकी पेशात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असतात.रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलच्या माध्यमातून त्या सामाजिक उपक्रमातही  नेहमीच अग्रेसर असतात. साहित्य क्षेत्रातही त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. त्यांना यापूर्वीही अनेक पुरस्कारांनी विविध संस्थांमार्फत गौरविण्यात आले आहे. त्यांना राज्यशासनाचा हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTeacherशिक्षक