शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोकण सुपुत्राची बाबा आमटेना हेमलकसा येथे सुरमयी मानवंदना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 11:15 IST

पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पात कणकवलीतील उदयोन्मुख शास्त्रीय संगीत गायक मनोज मेस्त्री यांची संगीत मैफिल झाली . या संगीत मैफिलीच्या माध्यमातून कोकणच्या या सुपुत्राने बाबा आमटेना सुरमयी मानवंदना दिली. तसेच रसिकांना मंत्रमुग्ध करीत त्यांची मने जिंकली.

ठळक मुद्देकणकवलीचे सुपुत्र मनोज मेस्त्री पं. समीर दुबळे यांचे शिष्य शास्त्रीय- उपशास्त्रीय गायन मैफिलीने रसिक मंत्रमुग्ध

सुधीर राणे कणकवली : पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पात कणकवलीतील उदयोन्मुख शास्त्रीय संगीत गायक मनोज मेस्त्री यांची संगीत मैफिल झाली . या संगीत मैफिलीच्या माध्यमातून कोकणच्या या सुपुत्राने बाबा आमटेना सुरमयी मानवंदना दिली. तसेच रसिकांना मंत्रमुग्ध करीत त्यांची मने जिंकली.हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाचा २३ डिसेंबर रोजी वर्धापन दिन होता. तर २५ डिसेंबर हा डॉ. मंदाकिनी आमटे यांचा वाढदिवस व २६ डिसेंबर हा पद्मविभूषण बाबा आमटे यांचा १०५ वा जयंती दिन आणि पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांचा वाढदिवस होता.

या अनोख्या दिनविशेषाच्या औचित्यावर साजरा झालेल्या सांस्कृतिक महोत्सवामध्ये मनोज मेस्त्री यांनी आपल्या सुरेल सुरातून "प्रकाशली सारी मने " या सांगीतिक कार्यक्रमातून स्वरमयी शुभेच्छा दिल्या. तसेच हेमलकसावासिय, तेथील आश्रमशाळेतील विद्यार्थी व तिथे आलेल्या असंख्य अभ्यागतांना सुखद अनुभूती दिली.या मैफिलीची संकल्पना स्वरदीक्षा , मुंबई या संस्थेने साकारली आणि त्यानिमित्त पं. समीर दुबळे यांचे शिष्य मनोज मेस्त्री यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मनोज मेस्त्री यांनी या मैफिलींमध्ये प्रथम राग मारुबिहाग मधील "अब मै यूही जाऊ" हा विलंबित बडा ख्याल व त्यानंतर मध्यलय त्रिताल मधील "नैना लागाई" व द्रुत ऐकताल मध्ये "आज रे बधावा गावो" हे बंदिश गाऊन शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार करण्याचा आपला हेतू स्पष्ट केला. त्यानंतर मराठीतील सुपरिचित अशी नाट्यपदे व भावगीत, अभंग गायन करून रसिकांना खिळवून ठेवले.

उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या मैफिलीचे निवेदन कवी गीतकार मिलिंद कुलकर्णी यांनी आपल्या ओघवत्या शैलीत करत या मैफिलीत रंगत आणली. या मैफिलीला तबला साथ नागपूर येथील प्रमोद बामणे व संवादिनी साथ नागपूरचे राहुल मानकर व तालवाद्यसाथ भूषण जाधव यांनी केली. पंकज डांगरे यांनी ध्वनी व्यवस्था सांभाळली.या मैफिलीस डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे तसेच अनिकेत आमटे, डॉ. दिगंत आमटे व आमटे परिवार तसेच हत्तीमित्र आनंद शिंदे हे विशेष उपस्थित होते. मैफिलीनंतर पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांच्या हस्ते मनोज मेस्त्रींना स्मृतिचिन्ह देऊन त्यांच्या पुढील सांगीतिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्वरदिक्षाच्या मानसी कुलकर्णी, अमोल चौधरी, श्रिया पाटील यांनी विशेष मेहनत घेतली. 

टॅग्स :musicसंगीतsindhudurgसिंधुदुर्ग