शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

कोकण रेल्वेला राजभाषा कीर्ती पुरस्कार, उद्या राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीत होणार गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 22:09 IST

- महेश सरनाईक । सिंधुदुर्ग, दि. 12 -  केरळ, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र जोडणा-या कोकण रेल्वेच्या शिरपेचात १४ सप्टेंबर रोजी आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. कोकण रेल्वेला राष्ट्रीय हिंदी दिनानिमित्ताने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिल्लीमध्ये ‘राजभाषा कीर्ती’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वेच्या प्रगतीची दारे आणखीनच खुली होण्यास ...

- महेश सरनाईक । सिंधुदुर्ग, दि. 12 -  केरळ, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र जोडणा-या कोकण रेल्वेच्या शिरपेचात १४ सप्टेंबर रोजी आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. कोकण रेल्वेला राष्ट्रीय हिंदी दिनानिमित्ताने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिल्लीमध्ये ‘राजभाषा कीर्ती’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वेच्या प्रगतीची दारे आणखीनच खुली होण्यास मदत होणार आहे. हा कोकण रेल्वेच्या विकास प्रक्रियेतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.कोकण रेल्वेने हिंदी भाषेच्या प्रचार आणि प्रसिद्धीबरोबरच ती वाढण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे हा पुरस्कार दिला जाणार आहे. तसे पाहिल्यास कोकण रेल्वेमध्ये फक्त २.७ टक्केच हिंदी भाषिक आहेत. उर्वरित क्षेत्रामध्ये महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्यातील स्थानिक भाषिक आहेत. असे असतानाही कोकण रेल्वेने हिंदी भाषा क्षेत्रामध्ये केलेल्या कामाचे मूल्यमापन होऊन त्यातून हा पुरस्कार दिला जात आहे. हिंदी भाषिक राज्यांमध्ये उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान ही राज्ये आघाडीवर आहेत. मात्र, केवळ मर्यादित भाषिक असतानाही कोकण रेल्वेने चांगले आणि दर्जेदार काम केले आहे.कोकण रेल्वेचा ‘ख’ क्षेत्रामध्ये गौरवहिंदी राजभाषा क्षेत्रांमधील ‘ख’ क्षेत्रामध्ये म्हणजे महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, चंदीगड, दमण-दीव व दादरा-नगरहवेली यात कोकण रेल्वेला राजभाषा कीर्ती पुरस्कार जाहीर झाला आहे. या राज्यांमध्ये हिंदी भाषेचा प्रचार, प्रसार आणि प्रसिद्धीसाठी कोकण रेल्वेने केलेले कार्य कौतुकास्पद आहे. त्यामुळे हा पुरस्कार दिला जाणार आहे.राजभाषा हिंदीचे तीन क्षेत्रात विभाजनराजभाषा हिंदीचे तीन क्षेत्रात विभाजन करण्यात आले आहे. यात ‘क’, ‘ख’, ‘ग’ असे तीन विभाग करण्यात आले असून ‘क’ क्षेत्रामध्ये बिहार, झारखंड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश, उत्तरांचल, अंदमान, निकोबार आणि दिल्लीच्या संघराज्य क्षेत्राचा समावेश आहे. ‘ख’ क्षेत्रामध्ये गुजरात, महाराष्ट्र, पंजाब, चंदीगड, दमण आणि दीव, दादरा नगरहवेली संघराज्य क्षेत्र आहे. ‘ग’ क्षेत्रात खंड आणि संघ राज्य क्षेत्रांपेक्षा वेगळी आणि संघराज्य यांचा समावेश आहे.संसदीय राजभाषा समितीकडून मूल्यमापनहिंदी ही आपली राजभाषा आहे. तिच्या प्रचार, प्रसार आणि प्रसिद्धीसाठी केलेल्या कार्याची पडताळणी करण्यासाठी देशाच्या गृहमंत्रालयाअंतर्गत एक राजभाषा समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या ३ उपसमित्या भारत सरकारच्या वेगवेगळ्या मंत्रालय विभागात हिंदीच्या प्रसारासाठी केलेल्या कामाचे मूल्यमापन करीत असतात. या संसदीय भाषा समितीची दुसरी उपसमिती रेल्वे मंत्रालय असून ती हिंदी भाषेसाठी केलेल्या कार्याचे मूल्यांकन करीत असते.पुरस्कार मिळणे अभिमानास्पदकोकण रेल्वेच्या विकासाची दारे आता खुली झाली आहेत. गेल्या तीन वर्षांत या महामंडळाने प्रत्येक बाबतीत केलेल्या कार्याची केंद्रस्तरावरून दखल घेतली जात आहे. कोकण रेल्वेला राजभाषा कीर्ती पुरस्कार मिळाला ही बाब आपल्या सर्वांसाठी खूपच अभिमानास्पद आहे. दोन वर्षांपूर्वी कोकण रेल्वेला असाच पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे हा दुसºयांदा गौरव होत आहे.- एल. के. वर्मा,मुख्य जनसंपर्क अधिकारी, कोकण रेल्वे

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे