कोकण रेल्वे तीन तास रखडणार

By Admin | Updated: March 1, 2015 23:15 IST2015-03-01T22:13:47+5:302015-03-01T23:15:48+5:30

नागोठणे - रोहा मार्गावर ३ मार्चपर्यंत मेगाब्लॉक

Konkan Railway will spend three hours | कोकण रेल्वे तीन तास रखडणार

कोकण रेल्वे तीन तास रखडणार

रत्नागिरी : नागोठणे ते रोहा मार्गाच्या कामासाठी १ ते ३ मार्चपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे या तीन दिवसांत मडगावहूून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना रोहा येथे तर मुंबईहून मडगावकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांना नागोठणे येथे दोन ते तीन तास थांबावे लागणार असल्याची घोषणा कोकण रेल्वेच्या सर्वच स्थानकांवर आज करण्यात आली. नागोठणे ते रोहा मार्गाच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे कोकण रेल्वे आता जवळपास तीन तास रखडणार आहेत. कोकण रेल्वेच्या सूत्रांनीच ही माहिती दिली आहे.नागोठणे ते रोहा मार्गावर दुपदरीकरणासह काम सुरू असून, त्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. रत्नागिरीहून सकाळी ८ नंतर मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या या मेगाब्लॉकमुळे रोहा येथे थांबवाव्या लागण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
अपघातानंतर रेल्वेमार्ग अडीच तासांत पूर्ववत !
पेणजवळ मंगला एक्सप्रेस या दक्षिणेकडे जाणाऱ्या गाडीचे तीन डबे आज सायंकाळी ५. ४५ वाजता रुळावरून घसरून झालेल्या अपघातामुळे कोकण रेल्वेमार्गावरील वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली. मात्र, रात्री ८.३० वाजेपर्यंत मार्गाची दुरूस्ती पूर्ण होऊन मार्ग वाहतुकीसाठी मोकळा होणार असल्याने बिकानेर एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने पाठवण्यात आली आहे.

Web Title: Konkan Railway will spend three hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.