शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक: कणकवली तालुक्यात सकाळी ११ वाजेपर्यंत शांततेत २४.१७ टक्के मतदान!

By सुधीर राणे | Updated: June 26, 2024 13:45 IST

कणकवली: कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आज, बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात शांततेत मतदानाला प्रारंभ झाला. कणकवली तालुक्यात सकाळी ...

कणकवली: कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आज, बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात शांततेत मतदानाला प्रारंभ झाला. कणकवली तालुक्यात सकाळी ११ वाजेपर्यंत २४.१७ टक्के मतदान झाले. दरम्यान, कणकवली येथील प्रांताधिकारी कार्यालय येथे आमदार नितेश राणे यांनी मतदानाचा हक्क बजावला.कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी १३ उमेदवार रिंगणात आहेत. महायुतीकडून भाजपचे निरंजन डावखरे तर महाविकासाघाडीकडून काँग्रेसचे रमेश किर निवडणूक लढवीत आहेत. सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान करण्याची मुदत आहे. कणकवली तालुक्यातील ३८६० मतदार आहेत. त्यासाठी  तालुक्यात सहा मतदान केंद्रांवर मतदानाची सोय करण्यात आली आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी सुमारे ४५ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे.कणकवली तालुक्यात न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटमध्ये दोन मतदान केंद्रे, कासार्डे माध्यमिक विद्यालय येथे एक केंद्र, कणकवली तहसीलदार कार्यालयात तहसीलदारांचे दालन व संगणक कक्ष अशी दोन मतदान केंद्रे तर कणकवली प्रांताधिकारी कार्यालयात एक अशी एकूण सहा मतदान केंद्रे आहेत. यात कासार्डे मतदान केंद्रांवर - ५३७ मतदार, कणकवली-७७६, कणकवली अ- ७७६, कणकवली ब- ८९८, फोंडाघाट-४२१, फोंडाघाट अ-४५२ एवढे मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महायुतीचा तर श्रीधर नाईक चौकात महाविकास आघाडीचा बुथ लावण्यात आला आहे. या ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी आहे.सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांताधिकारी जगदिश कातकर,कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, नायब तहसीलदार मंगेश यादव, शिवाजी राठोड, निवडणूक नायब तहसीलदार प्रिया हर्णे, शिरस्तेदार गौरी कट्टे आदी अधिकारी काम पाहत असून प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदान केंद्राध्यक्ष, कर्मचारी, पोलिस, मायक्रो ऑब्झरव्हर, शिपाई असे प्रत्येकी ७ कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गElectionनिवडणूक 2024konkanकोकणVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक 2024