कोंडमळा मिनीबस अपघातात महिला ठार

By Admin | Updated: August 24, 2014 22:36 IST2014-08-24T22:18:12+5:302014-08-24T22:36:04+5:30

‘श्रावणधारा’ झालाच...

Kondamlah minibus killed women in an accident | कोंडमळा मिनीबस अपघातात महिला ठार

कोंडमळा मिनीबस अपघातात महिला ठार

सावर्डे : कोंडमळा येथे मिनीबसचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात एक महिला ठार झाली, तर आठजण गंभीर जखमी झाले आहेत. माजी आमदार बाळ माने यांच्यातर्फे रत्नागिरी येथे आयोजित केलेला श्रावणधारा कार्यक्रम सादर करण्यासाठी हा कलावंतांचा चमू रत्नागिरीकडे चालला होता. त्यात कार्यक्रमाचे मुख्य अभय पाटील यांची आई वैजयंती पाटील यांचा मृत्यू झाला, तर अभय पाटील हे गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडला. मिनीबस (एमएच ०६ एस ८६९२) चा उजवीकडील टायर फुटल्याने बस पलटी झाली. यामध्ये वैजयंती पाटील (५८) या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर अभय पाटील, महेश कंठे (कल्याण), सुधीर (मिरारोड), सिद्धेश कमाने (माहीम), चंद्रकांत पांचाळ (मानखुर्द), गौरी जाधव (मीरारोड), धनंजय काजरोळकर (वडाळा), सचिन गर्के (दादर) हे जखमी झाले. (वार्ताहर)

‘श्रावणधारा’ झालाच...
रत्नागिरी येथे श्रावणधारा हा कार्यक्रम २४ आॅगस्ट रोजी सादर करण्यासाठी कलावंतांचा चमू रत्नागिरीकडे येताना अपघात झाल्याने कलावंतांच्या दु:खात सहभागी होत कार्यक्रम रद्द करण्याबाबत आयोजक यश फाऊंडेशनतर्फे सांगण्यात आले. मात्र, जखमी अवस्थेत व आईचा मृत्यू झाला असतानाही अभय पाटील यांनी अन्य कलावंतांना हा कार्यक्रम सादर करण्यास उपचारानंतर रत्नागिरीत पाठविले व कार्यक्रम झाला. अभय पाटील आपल्या आईचा मृतदेह घेऊन मुंबईकडे रवाना झाले.

Web Title: Kondamlah minibus killed women in an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.