शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

सहलीला गेला, पोहण्यासाठी तारकर्लीच्या समुद्रात उतरला अन् बुडाला; शोधकार्य सुरुच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 11:45 IST

अहो फोन भिजला आहे..

मालवण : सहलीसाठी आलेल्या मुरगूड येथील संगणक प्रशिक्षण संस्थेच्या ग्रुपमधील एक विद्यार्थी तारकर्ली समुद्रात बुडून बेपत्ता झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. आदित्य पांडुरंग पाटील (२१ रा. बस्तवडे, ता. कागल, जि. कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. तर अजिंक्य बळीराम पाटील (२०, रा. कौलगे, ता. कागल) यासह प्रसाद चौगुले, रितेश वायदंडे या दोघांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले. अजिंक्यवर मालवण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.हे सर्व विद्यार्थी मुरगूड (जि. कोल्हापूर) येथील एका संगणक प्रशिक्षण संस्थेमार्फत सहलीसाठी आले होते. समुद्रात मुले बुडत असल्याचे समजताच स्थानिकांनी जिवाची पर्वा न करता तत्काळ समुद्रात झेप घेतली. मात्र खोलवर शोधकार्य करूनही आदित्य सापडू शकला नाही. या शोधकार्यात तारकर्ली स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्राचे स्कुबा डायव्हर्सही सहभागी झाले होते.मुरगूड येथील २० विद्यार्थ्यांचा एक ग्रुप तारकर्ली येथे सहलीसाठी आला होता. हे सर्व मुरगूड येथील एका संगणक प्रशिक्षण क्लासेसचे विद्यार्थी होते. यामध्ये ८ मुले व १२ मुली आणि एका शिक्षिकेचा समावेश होता. शुक्रवारी कुणकेश्वर येथे देवदर्शन करून सायंकाळी तारकर्ली येथील समुद्रात हे विद्यार्थी पोहण्यासाठी उतरले होते. यावेळी आदित्य हा समुद्रात बुडून बेपत्ता झाला. तर अजिंक्य पाटील, प्रसाद चौगुले, रितेश वायदंडे सर्व हे खोल समुद्रात ओढले जाऊ लागले. यातून आदित्य हा समुद्रात बेपत्ता झाला आहे. यावेळी तत्काळ रुग्णवाहिका बोलाविण्यात आली. बचावलेल्या अजिंक्यला त्वरित रुग्णवाहिकेतून सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले.सायंकाळ झाल्याने बचाव कार्यात अडथळेमुले समुद्रात बुडत असल्याचे लक्षात येताच सोबत असलेल्या विद्यार्थी आणि प्रशिक्षकांनी मोठ्या आवाजाने स्थानिकांना बोलावून घेतले. स्थानिक मच्छीमार आणि तारकर्ली स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्राच्या सदस्यांनी समुद्रात धाव घेतली. मोठ्या प्रयत्नाने अजिंक्य पाटील व अन्य दोघांना समुद्राबाहेर काढण्यात स्थानिकांना यश आले. मात्र आदित्य पाटील हा समुद्रात दिसेनासा झाला. त्याचा शोध घेण्याचा स्थानिकांनी बराच वेळ प्रयत्न केला. सूर्य मावळतीला गेल्यामुळे बचाव कार्यात अडथळे आले...अन् आदित्य हातातून निसटलाजखमी अजिंक्य पाटील याने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही समुद्रात उतरल्यानंतर आदित्य आणि मी पाण्यात बुडू लागलो. अशा परिस्थितीत मी त्याला ओढत पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी अचानक मोठी लाट आली आणि आदित्य माझ्या हातून निसटला. आणि पाण्यात दिसेनासा झाला. नाहीतर तो सुद्धा सुखरूप आमच्यासोबत असता असे अजिंक्य याने सांगितले.

अहो फोन भिजला आहे.....

आदित्य ची आई आणि बाबा सांयकाळी सात वाजल्या पासून त्याला फोन करत आहेत पण त्याचा फोन बंद लागतो आहे रात्री दहा पर्यंत परत येणार म्हणून सांगितल्याने ते त्याचा मित्र रितेश यांच्या घरी जाऊन पोरांचा काय फोन आला का अशी केविलवाणी चौकशी करत आहेत. त्यांना आदित्य बेपत्ता आहे याची फुसटशीही कल्पना नाही. त्यामुळे रितेशच्या घरातील लोकांनी धाडसाने त्यांच्या घरी जाऊन आदित्य फोन समुद्रात अंघोळ करताना भिजला आहे त्यामुळे तो बंद झाला आहे पण ते व्यवस्थित आहेत सकाळ पर्यंत परत येणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkolhapurकोल्हापूरdrowningपाण्यात बुडणे