शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

Sindhudurg: रेल्वे केबल चोरीप्रकरणी कोडोलीतील तरुणाला अटक, चारचाकीही जप्त 

By सुधीर राणे | Updated: July 12, 2024 12:15 IST

कणकवली : कणकवली बॅ. नाथ पै नगर येथील रेल्वे ट्रॅक्शनच्या वर्कशॉपमधील खोलीच्या शटरचे लॉक हत्याराने तोडून २ लाख ३४ ...

कणकवली : कणकवली बॅ. नाथ पै नगर येथील रेल्वे ट्रॅक्शनच्या वर्कशॉपमधील खोलीच्या शटरचे लॉक हत्याराने तोडून २ लाख ३४ हजार किंमतीचे तांब्याच्या  तारेचे बंडल व कंडक्टरचे तुकडे चोरल्या प्रकरणी कणकवली पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातील हंबीरराव सावळा गोसावी (४०, रा, कोडोली, ता.पन्हाळा) या भंगार विक्रेत्या संशयिताला अटक केली आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेल्या बोलेरो पिकअप गाडीसह त्याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी आणखीही चार ते पाच  संशयितांची नावे समोर येत असून तेही पोलिसांच्या रडारवर आहेत. सुमारे १५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज तपासत कणकवली पोलिसांनी ही कारवाई केली. ही चोरीची घटना २२ जून ते २४ जून या मुदतीत घडली होती. याबाबतची तक्रार त्या वर्कशॉपमधील रेल्वेचे विभागीय वरिष्ठ अभियंता संजीवकुमार बेलवलकर यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास कणकवलीचे स्थानिक पोलिस, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि रेल्वे सुरक्षा बलही समांतररित्या करत होते.कणकवलीचे पोलिस निरीक्षक समशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ व त्यांच्या सहकार्‍यांनी या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हा ज्या वर्कशॉपमध्ये घडला तेथून  कणकवली शहर ते कोल्हापूर पर्यंत जवळपास १५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज तपासले. या फुटेजमध्ये संशयिताने वापरलेली गाडी निष्पन्न झाली होती. संशयिताने नंबर ओळखू येऊ नये यासाठी नंबर प्लेटला चिखल लावला होता. पोलिसांना शेवटच्या कॅमेर्‍यात गाडीचा नंबर दिसून आला. कणकवली पोलीस पथकाने बुधवारी कोल्हापूरातील कोडोली गावात सापळा रचला. त्यांच्यासोबत कणकवली रेल्वे सुरक्षा बलाचे यादव हे देखील होते. मध्यरात्रीच्या सुमारास हंबीरराव गोसावी याला कोडोलीतील घरातून ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्ह्यात वापरलेली बोलेरो पिकअपही जप्त करण्यात आली. संशयित हा भंगार विक्री करतो. चोरीच्या घटनेदिवशी त्याच्या सोबत आणखीही काहीजण होते. तेही पोलिसांच्या रडारवर आहेत.सुमारे अडीच लाखाहून अधिक किंमतीचे रेल्वेचे भंगार चोरीस गेल्याने रेल्वे पोलिसांसह सर्वच यंत्रणा चोरट्यांच्या मागावर होती. संशयिताला शुक्रवारी कणकवली न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्याने चोरी केलेले भंगार कुठे विकले, त्याच्यासोबत आणखी कोणाचा सहभाग आहे, त्याच्यावर आणखी काही गुन्हे दाखल आहेत का?  याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक समशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे करत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गrailwayरेल्वेtheftचोरी