शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

किंगकोब्रा साप पकडून केला व्हिडिओ; संशयिताला अटक

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: September 7, 2022 13:42 IST

दुर्मिळ प्रजातीच्या सापाला अवैद्यरित्या ताब्यात ठेवण्यासाठी तीन ते सात वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : दोडामार्ग तालुक्यातील पाळये गावामध्ये सोमवारी सायंकाळी पकडलेला दुर्मिळ किंगकोब्रा प्रजातीचा साप अवैधरित्या बाळगून त्याचे चित्रीकरण करणे, प्रदर्शन करणे या प्रकरणी संशयित राहुल विजय निलगिरी या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित दोडामार्ग येथे राहणारा असून मंगळवारी सायंकाळी वनविभाग अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. अशी माहिती वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी दिली.

या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेला आरोपी राहुल विजय निरलगी हा सर्प इंडिया या एनजीओच्या अंतर्गत काम करत असून गेली दोन-तीन दिवस तो पाळये येथे दिसून येणाऱ्या किंगकोब्रा सापाच्या पाळतीवर होता. किंगकोब्रा सापाला पकडण्यापूर्वी वनविभागाला पूर्वकल्पना देणे गरजेचे आहे हे त्या युवकाला माहीत होते. तरीदेखील त्याने दोडामार्ग येथील स्थानिक वनअधिकारी व कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता किंकोब्रा अवैद्यरित्या पकडून आपल्या ताब्यात ठेवला.दोडामार्ग वनपरिक्षेत्र कार्यलयाला सोमवारी सायंकाळी याप्रकरणी गुप्त माहिती मिळताच संबंधित युवकाचा व त्याच्या ताब्यात असलेल्या किंगकोब्रा सापाचा वनविभागाने शोध सुरू केला. आरोपी राहुल नीरलगी याचेशी वन अधिकारी व कर्मचारी यांनी फोनवर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु रिंग होऊन देखील त्याने कुणाचाही फोन उचलला नाही किंवा दुर्मिळ किंगकोब्रा वन विभागाच्या ताब्यात दिलेला नाही. सकाळी संशयिताला वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यलयात चौकशीसाठी बोलावण्यात आले. त्यावेळी चौकशीदरम्यान त्याच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. तसेच गुन्ह्यात फोटो-व्हिडीओ काढण्यासाठी वापरलेला मोबाईल फोन त्याने लंपास केला असल्याचे निदर्शनास आले.

सर्पमित्रांनी दुर्मिळ सापांना पकडू नये : मदत क्षीरसागर

किंगकोब्रा सापाला अवैद्यरित्या बाळगून त्याचे पुरावे नष्ट केल्यामुळे सायंकाळी त्याच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम-१९७२ च्या तरतुदींचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असल्याची माहिती वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी दिली. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मध्ये ज्याप्रमाणे वाघ, बिबट, गवा या प्राण्यांना संरक्षण देण्यात आलेले आहे. त्याच प्रमाणे दुर्मिळ अशा किंगकोब्रा सापाला देखील संरक्षित करण्यात आलेले आहे. त्यानुसार या दुर्मिळ प्रजातीच्या सापाला अवैद्यरित्या ताब्यात ठेवण्यासाठी तीन ते सात वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. तरी वनविभागामार्फत सर्व सर्पमित्रांना आवाहन करण्यात येते की वन विभागाला कळविल्याशिवाय असे दुर्मिळ साप अवैधरित्या आपल्या ताब्यात बाळगू नये असे आवाहन वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी केले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforest departmentवनविभाग