कोकण रेल्वे कर्मचाऱ्यावर खुनी हल्ला
By Admin | Updated: November 10, 2014 00:46 IST2014-11-10T00:28:56+5:302014-11-10T00:46:15+5:30
सुकिवलीतील घटना : दोन संशयित आरोपींना अटक

कोकण रेल्वे कर्मचाऱ्यावर खुनी हल्ला
खेड : खेड तालुक्यातील सुकिवली येथे चोरीच्या उद्देशाने कोकण रेल्वे कर्मचाऱ्याच्या खुनाचा केलेला प्रयत्न शिवसेना उपसरपंचांच्या अवचित येण्यामुळे फसला. पोलिसांनी सापळा रचून या प्रकरणातील दोन्हीही संशयित आरोपींना अटक केली आहे. सुकिवली चव्हाणवाडीनजीक काल, शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे़
येथील भरत तुकाराम धाडवे (वय ४०) हे कोकण रेल्वेत काम करतात. काल रात्री ते खेड रेल्वेस्थानकातील आपले काम आटोपून दुचाकी (एमएच-०८/एए-४७८८)वरून घरी परतत होते. याचवेळी संतोष हनुमान पवार (२४, करंजाडी, ता. महाड, मूळगाव कोपरगी, विजापूर) आणि अविनाश रामू पवार (१९, सवाद, पोलादपूर, मूळगाव कोपरगी) हे दोघेजण दुचाकी (एमएच-०६/एटी-६१५७)वरून त्यांचा पाठलाग करीत होते. भरणे येथून त्यांनी पाठलाग सुरू केला. धाडवे यांच्या ते लक्षात आले नव्हते. सुकिवली चव्हाणवाडीदरम्यान दोघांनी धाडवे यांच्या दुचाकीला मागून ठोकरले़ त्यामुळे धाडवे खाली पडले़
रात्रीच्या अंधारात सर्वत्र सामसूम असल्याचा फायदा घेत आरोपींनी धाडवे यांची पँट काढली़ त्यांचे हात, पाय आणि तोंडही बांधून ठेवले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्याकडे असलेला मोबाईल, मनगटी घड्याळ आणि रोख रुपये ५०० असा सहा हजार २५० रुपयांचा ऐवज जबरीने काढून घेतला. ही बाब कोणालाही कळू नये, यासाठी धाडवे यांना मारण्याचा कटही आखण्यात आला. (पान ८ वर)
निवृत्त बँक कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला
( पान १ वरून) हल्लाप्रकारानंतर भोगवे परिसरात जमा झालेल्या ग्रामस्थांनी कोरगावकर यांना रुग्णालयात दाखल केले. याबाबतची तक्रार अरुण कोरगावकर यांनी परूळे पोलीस ठाण्यात दिली असून, पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जे. एन. नाईक करीत आहेत. या घडलेल्या प्रकारामुळे भोगवे परिसरात खळबळ उडाली असून बुरखाधारी व्यक्ती स्थानिकच असावी, असा अंदाज ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
(प्रतिनिधी)
हल्लाप्रकारानंतर भोगवे परिसरात जमा झालेल्या ग्रामस्थांनी कोरगावकर यांना रुग्णालयात दाखल केले. याबाबतची तक्रार अरुण कोरगावकर यांनी परूळे पोलीस ठाण्यात दिली असून, पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जे. एन. नाईक करीत आहेत. या घडलेल्या प्रकारामुळे भोगवे परिसरात खळबळ उडाली असून बुरखाधारी व्यक्ती स्थानिकच असावी, असा अंदाज ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
(प्रतिनिधी)