सावंतवाडी महोत्सवात केसरकरांचा नागरी सत्कार
By Admin | Updated: December 9, 2014 23:21 IST2014-12-09T20:17:00+5:302014-12-09T23:21:23+5:30
समित्यांची घोषणा : बबन साळगावकर यांची बैठकीत माहिती

सावंतवाडी महोत्सवात केसरकरांचा नागरी सत्कार
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिकेच्या महोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. पालिकेचा एक नगरसेवक मंत्रिपदापर्यंत पोचू शकल्याने हा नववा महोत्सव आमच्या नवलाईचा असणार असल्याचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी स्पष्ट केले. या महोत्सवाच्या निमित्ताने नव्यानेच मंत्री झालेल्या दीपक केसरकर यांचा शहराच्यावतीने नागरी सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी साळगावकर यांनी दिली.
या महोत्सवासाठीच्या समित्या सोमवारी पालिका बैठकीत जाहीर करण्यात आल्या. यावेळी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, नगरसेवक सुभाष पणदूरकर, विलास जाधव, देवेंद्र टेमकर, नगरसेविका शर्वरी धारगळकर, साक्षी कुडतरकर, अफरोझ राजगुरू, किर्ती बोंद्रे आदी यावेळी उपस्थित होते.
महोत्सवाच्या वेगवेगळ््या समित्या तयार करण्यात आल्या असून या समित्यांमध्ये शहरातील प्रतिष्ठित नागरिकांची वर्णी लावण्यात आली आहे.
यामध्ये समन्वय स्वागत, सांस्कृतिक कार्यक्रम, स्टॉल, कायदेविषयक सल्लागार, प्रायोजक, स्टेज, निवास व्यवस्था, विद्युत रोषणाई, बैठक व्यवस्था, शोभायात्रा, स्वच्छता व पाणीपुरवठा, सुरक्षा व स्वंयसेवक, पाककला समिती आदी समित्या नेमण्यात आल्या आहेत. प्रत्येक समितीवर नगरसेवक हे पदसिद्ध अध्यक्ष आहेत.
या समित्यांच्या बैठका महोत्सवाच्या पूर्वी होणार असून त्यात महोत्सवाचे नियोजन करण्यात येणार आहेत. या समित्याच्या नियोजनाप्रमाणेच महोत्सव होणार असल्याचे नगराध्यक्षांनी बैठकीत स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
सुरेश प्रभूही येणार
सावंतवाडी नगरपालिकेचा नववा महोत्सव यावर्षी होत असून या महोत्सवाचा दुहेरी आनंद आहे. येथील एक नगरसेवक राज्यमंत्रिपदापर्यंत पोहोचला असून त्यांचा यानिमित्ताने नागरी सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू उपस्थित राहणार असल्याचे साळगावकर म्हणाले.
या महोत्सवाचे कार्यक्रम अद्याप निश्चित झाले नसून कार्यक्रम
ठरविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.