शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: दरड कोसळल्याने करुळ घाट १२ सप्टेंबरपर्यंत बंद; वाहतूक भुईबावडा, फोंडा घाटमार्गे वळविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 13:41 IST

परतीच्या प्रवासातील गणेशभक्तांना फटका 

वैभववाडी : मुसळधार पावसामुळे करूळ घाटात गुरुवारी सकाळी ०८:०० वाजेच्या सुमारास दरड कोसळली. दगडमातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर आल्यामुळे तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे परतीच्या मार्गावर असलेल्या गणेशभक्तांना मोठा फटका बसला.दरम्यान, ब्रेकर आणि दोन जेसीबीच्या साहाय्याने दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, १२ सप्टेंबरपर्यंत हा घाटमार्ग बंद ठेवण्यात आला आहे.घाट परिसराला बुधवारी सायंकाळी मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. गुरुवारी सकाळीही ७ वाजेपासून घाट परिसरात जोरदार पाऊस सुरू होता. या पावसामुळे करूळ घाटात सकाळी ८० वाजेच्या सुमारास डोंगराचा मोठा भाग कोसळला. दगड, मातीच्या मोठ्या ढिगाऱ्याने ५० ते ६० मीटर रस्ता व्यापला . यामुळे तळेरे- कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.दरम्यान, परतीच्या प्रवासाला निघालेले गणेशभक्त कोल्हापूरमार्गे पुणे-मुंबईकडे या घाटमार्गाने जात होते. त्यांना अर्ध्या घाटातून माघारी परतून भुईबावडा, अणुस्कुरा, फोंडाघाट या मार्गांचा पर्याय निवडावा लागला. दरड कोसळल्याची माहिती वैभववाडी पोलिसांना मिळताच त्यांनी एडगाव येथून भुईबावडामार्गे, तर अवजड वाहतूक फोंडाघाटमार्गे वळविली.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी ९ वाजेच्या सुमारास घाटात पोहोचले. त्यानंतर दोन जेसीबीच्या साहाय्याने दरड हटविण्यास सुरुवात करण्यात आली; परंतु दरडीमध्ये मोठ्या दगडांचा समावेश असल्याने ते ब्रेकरच्या साहाय्याने फोडून हटविले जात आहेत. याशिवाय दरीमध्ये दगड ढकलल्यास रस्ता खचण्याचा धोका असल्याने कोसळलेले दगड व माती डंपरमध्ये भरून दुसरीकडे नेली जात आहे.

तहसीलदार, पोलिस निरीक्षकांकडून घाटात पाहणीघाटात दरड कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार सूर्यकांत पाटील, पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. करुळ घाटात गुरुवारी सकाळी मोठी दरड कोसळली. तसेच घाटमार्गात सातत्याने दरडींची पडझड सुरु असल्यामुळे १२ सप्टेंबरपर्यंत हा घाटमार्ग बंद ठेवण्यात आला आहे. या काळात करुळ घाटमार्गाची वाहतूक भुईबावडा आणि फोंडा घाटमार्गे सुरु राहणार आहे. त्यासंदर्भात अप्पर जिल्हाधिकारी मच्छींद्र सुकटे यांनी आदेश जारी केला आहे. दरम्यान या घाटमार्गाच्या सर्वेक्षणासाठी तज्ञांचे पथक बोलावण्यात येणार आहे.