शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : करुळ घाटपायथ्याला आरामबसची ट्रकला धडक, दोन्ही चालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 12:43 IST

करुळ घाटपायथ्याशी दिंडवणे फाट्यानजीक आरामबस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही चालक जखमी झाले असून वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देकरुळ घाटपायथ्याला आरामबसची ट्रकला धडक दोन्ही चालक जखमीजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु; वाहनांचे मोठे नुकसान

वैभववाडी : करुळ घाटपायथ्याशी दिंडवणे फाट्यानजीक आरामबस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही चालक जखमी झाले असून वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. हा अपघात सकाळी सव्वासातच्या सुमारास घडला. दरम्यान आरामबस चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.गणेश शंकर जाधव(33, रा. सातारा) व निलेश अनंत पवार(27, रा. दत्तनगर, वैभववाडी) अशी जखमी चालकांची नावे आहेत. यातील निलेश पवार याला गंभीर दुखापत झाली आहे. तर गणेश जाधव याच्या पायाला किरकोळ दुखापत झाली असून दोघांनाही जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.कासार्डे येथून सिलिका वाळू भरलेला ट्रक(एम.एच.07; पी-1982) घेऊन निलेश पवार कोल्हापूरला निघाला होता. आरामबस(एम.एच.08; ई- 9992) मुंबईहून कोल्हापूरमार्गे गोव्याला जात होती.करुळ घाटपायथ्याशी दिंडवणे फाट्यानजीकच्या वळणावर आरामबसने ट्रकला जोरदार धडक दिली. त्यामध्ये ट्रक आणि आरामबसच्या केबीनचा चुराडा झाला. गावातील प्रदीप पडवळ, हेमंत पाटील, प्रज्वल गायकवाड, गौरव मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढण्यास सहकार्य केले.अपघाताची माहिती मिळताच पोलीस हवालदार राजू जामसंडेकर, पोलीस नाईक राजेंद्र खेडकर, शरद इंजुलकर अपघातस्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळावरुन अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली. या अपघात प्रकरणी आरामबस चालक गणेश जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून हवालदार राजू जामसंडेकर या अपघाताचा तपास करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्ग