कऱ्हाड-चिपळूण रेल्वे मार्गाला हिरवा कंदील?
By Admin | Updated: February 25, 2015 00:06 IST2015-02-24T22:51:18+5:302015-02-25T00:06:47+5:30
रेल्वे बजेट : सातारकरांना लागली उत्सुकता

कऱ्हाड-चिपळूण रेल्वे मार्गाला हिरवा कंदील?
सातारा : दिल्लीच्या रेल्वे बजेटमध्ये सातारा जिल्ह्याला काय मिळणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या मागण्यांपैकी कऱ्हाड-चिपळूण नवीन लोहमार्गाला हिरवा कंदील मिळणार काय, याबद्दल सातारकरांना अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे.सातारा रेल्वे स्टेशनचे अद्यावतीकरण करावे, रेल्वेस्टेशनवर महिलांसाठी स्वतंत्र प्रतिक्षालय बांधावे, सातारा ते कोल्हापूर डबलट्रॅक करावा, कराड-चिपळुण नवीन लोहमार्ग विकसित करावा, सातारा जिल्ह्याातील मसूर, रहिमतपूर आणि वाठार येथे रेल्वे ओव्हर ब्रिज उभारण्यात यावेत आदी प्रमुख मागण्यांसह रेल्वे प्रशासन गतीमान आणि सक्षम करण्याबाबतच्या सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी रेल्वेच्या पुणे आणि सोलापूर विभागातील संसद सदस्यांच्या बैठकीत केल्या. राज्य शासनाने ५० टक्के खर्च उचलण्याची तयारी दर्शविल्याने एकूण ९२० कोटी रुपयांचा व सुमारे १११ कि. मी. लांबीच्या चिपळूण-खेर्डी-कोयनानगर-पाटण-कऱ्हाड असा नवीन लोहमार्ग प्रस्ताव २०१० साली रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे, तो पूर्णत्वास जाणे गरजेचे आहे. दिल्ली-मुंबई-बेंगलोर असा कॅरिडॉर नजीकच्या काळात होत आहे. त्यामुळे पुणे- कोल्हापूर या दरम्यान आता असलेल्या सिंंगल रेल ट्रॅक ऐवजी डबल रेल ट्रॅकची उभारणी करावी, त्यामुळे रेल्वे गाड्यांंच्या सुविधा संख्येत आणखी वाढ करता येईल आणि रेल्वे क्रॉसिंंगकरिता वाया जाणारा वेळ वाचेल, सातारा रेल्वे स्थानकावरुन दररोज ४४ रेल्वे गाड्यांची ये-जा सुरु असते, त्यामानाने एकंदरीत रेल्वे स्थानकाला नवीन रुपडे देणे गरजेचे आहे, त्याकरीता सातारा रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण करावे, प्रवासी महिलांसाठी स्वतंत्र प्रतीक्षालय उभारावे, सातारा जिल्ह्यातील मसूर, रहिमतपूर आणि वाठार येथे रेल्वे आव्हर ब्रीज उभारण्यात यावेत, रेल्वेच्या वेळेत, रेल्वेचीच सातारा शहर ते रेल्वेस्टेशन अशी बस सेवा सुरु करावी, अशा अनेक मागण्या आजपर्यंत वेळोवेळी केल्या गेल्या आहेत.
खासदार उदयनराजे भोसले यांनीही रेल्वेच्या बैठकीत याचा पाठपुरावा केला आहे. (प्रतिनिधी)