शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत तरुणावर चाकूने हल्ला ; हल्लेखोर पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 18:50 IST

Crimenews Sindhudurg : बाळा वळंजू मित्र मंडळाच्या रुग्णवाहिकेवर चालक असलेल्या कणकवली शहरातील जळकेवाडी येथील तरुणावर हरकुळ बुद्रुकमधील एकाने धारदार चाकूने खुनी हल्ला केल्याची घटना मंगळवारी घडली.

ठळक मुद्देकणकवलीत तरुणावर चाकूने हल्ला ; हल्लेखोर पसार​​भरदिवसा झालेल्या हल्ल्याने एकच खळबळ

कणकवली : बाळा वळंजू मित्र मंडळाच्या रुग्णवाहिकेवर चालक असलेल्या कणकवली शहरातील जळकेवाडी येथील तरुणावर हरकुळ बुद्रुकमधील एकाने धारदार चाकूने खुनी हल्ला केल्याची घटना मंगळवारी घडली. त्या तरुणाच्या पोटात चाकूने वार करण्याचा प्रयत्न हल्लेखोर करीत असतानाच प्रसंगावधान राखल्याने तो बालंबाल बचावला आहे. मात्र, त्याच्या कानाला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी तरुणाचे नाव उत्तम चंद्रकांत पुजारे (३३)असे आहे.या घटनेनंतर तेथील लोकांनी आरडाओरडा केल्याने हल्लेखोराने पलायन केले. तसेच जखमी उत्तम पुजारे याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कणकवली पोलिस ठाण्यामध्ये सुरू आहे.याबाबत घटनास्थळावरून उपलब्ध माहितीनुसार उत्तम पुजारे हा बाळा वळंजू मित्र मंडळाच्या रुग्णवाहिकेचा चालक म्हणून काम करतो. हरकुळ बुद्रुक येथील एका तरुणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून हरकुळ बुद्रुक येथील संशयित आरोपीने पुजारे यांच्या घराजवळ जात मंगळवारी दुपारी ​११.३० वाजण्याच्या सुमारास चाकूने हल्ला केला.मात्र,सुदैवाने या हल्ल्यात पुजारे बालंबाल बचावला आहे. पोलिसांनी संशयित आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, भरदिवसा कणकवली शहरात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKankavli Police Stationकणकवली पोलिस स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग