शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
अरुणाचल हादरलं! HIV रॅकेट आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
3
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
4
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
5
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
6
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
7
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
9
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
10
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
11
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
12
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
13
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
14
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
15
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
16
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
17
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
18
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
19
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
20
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...

पालकमंत्र्यांची ग्वाही : कणकवलीला लॉकडाऊनमध्ये मिळणार सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 18:08 IST

CoroaVirus Sindhudurg : सिंधुदुर्गसाठी एकाचवेळी लॉकडाऊन जाहीर झाले तरी, कणकवलीने त्यापूर्वी ८ दिवसांपासून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे कणकवलीतील व्यापारी व जनतेकरिता सवलत म्हणून कणकवलीत १४ मेपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे व विरोधी गटनेते सुशांत नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर यांना दिली.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांची ग्वाही : कणकवलीला लॉकडाऊनमध्ये मिळणार सवलतनगराध्यक्ष, विरोधी नगरसेवक, व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक

कणकवली : सिंधुदुर्गसाठी एकाचवेळी लॉकडाऊन जाहीर झाले तरी, कणकवलीने त्यापूर्वी ८ दिवसांपासून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे कणकवलीतील व्यापारी व जनतेकरिता सवलत म्हणून कणकवलीत १४ मेपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे व विरोधी गटनेते सुशांत नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर यांना दिली.सिंधुदुर्ग जिल्ह्यात लॉकडाऊन होणार ही माहिती समजल्यानंतर कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी तातडीने शनिवारी बैठक घेत विरोधी नगरसेवक व व्यापारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. यावेळी कणकवलीला या लॉकडाऊनमध्ये सवलत द्यावी, अशी मागणी नगराध्यक्ष समीर नलावडे, विरोधी नगरसेवक आणि व्यापाऱ्यांनी पालकमंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे दूरध्वनीद्वारे संपर्क करून केली. त्यावेळी पालकमंत्र्यांनी सवलत देण्याचे मान्य केले.यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, कणकवलीचे मुख्याधिकारी अवधूत तावडे, विरोधी गटनेते सुशांत नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर, व्यापारी संघटनेचे तालुकाध्यक्ष दीपक बेलवलकर, जिल्हा पदाधिकारी महेश नार्वेकर, राजू गवाणकर, राजेश पारकर, सुशील पारकर, राजेश राजाध्यक्ष, शेखर गणपत्ये, विशाल कामत आदी उपस्थित होते.या बैठकीत राजेश राजाध्यक्ष यांनी नगरपंचायतीमार्फत आवाहन केल्यानंतर जनता कर्फ्यूमध्ये सहभागी झालो. आता प्रशासनाचे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर राज्य सरकारने जर लॉकडाऊन जाहीर केले व त्यानंतर पुन्हा केंद्र सरकारमार्फत जाहीर झाले तर व्यापाऱ्यांनी करायचे काय? असा प्रश्न विचारला. या संदर्भात पालकमंत्री व सर्व आमदारांशी व्यापारी संघटनेने चर्चा करावी, अशी सूचना नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी मांडली. त्यानुसार आमदारांशी चर्चा करून निर्णय घेण्यात आला.निर्णयावर एकमत१३ मेपर्यंत लॉकडाऊनमध्ये सहभागी व्हा. १४ मेपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. त्यानंतर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक व व्यापाऱ्यांच्या बैठकीत एकमत झाले व तसा निर्णय पालकमंत्री उदय सामंत यांना कळविण्यात आला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्गUday Samantउदय सामंत