शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीतील भाजी मार्केट बांधकाम नियमानुसारच : राजन तेली यांचे स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 12:35 IST

कणकवली नगरपंचायत आरक्षित भूखंड क्रमांक २५ मधील भाजी मार्केट इमारत बांधकाम कायदेशीर आणि नियमानुसारच आहे. मात्र, कणकवलीतील अनधिकृत बांधकाम विरोधात आमदार नीतेश राणे यांची मोहिम स्वागतार्ह आहे. परंतु त्याची सुरुवात त्यांनी आपल्या घरापासून करावी. असा टोला भाजपा प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी लगावला आहे

ठळक मुद्देकणकवलीतील भाजी मार्केट बांधकाम नियमानुसारच : राजन तेलीराणे यांनी केलेल्या आरोपाचे खंडन

कणकवली : कणकवली नगरपंचायत आरक्षित भूखंड क्रमांक २५ मधील भाजी मार्केट इमारत बांधकाम कायदेशीर आणि नियमानुसारच आहे. मात्र, कणकवलीतील अनधिकृत बांधकाम विरोधात आमदार नीतेश राणे यांची मोहिम स्वागतार्ह आहे. परंतु त्याची सुरुवात त्यांनी आपल्या घरापासून करावी, असा टोला भाजपा प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी लगावला आहे.कणकवलीतील सुरु असलेले भाजी मार्केट इमारतीचे काम नियमबाह्य असल्याचा आरोप करीत आमदार नितेश राणे यांनी नागपुर येथील अधिवेशना दरम्यान मुख्यमंत्री व नगरविकास राज्यमंत्र्यांना त्याबाबत कारवाई करण्यासाठी निवेदन दिले होते. या निवेदनात आमदार राणे यांनी केलेल्या आरोपाचे खंडन राजन तेली यांनी केले आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, 'क'वर्ग नगरपंचायतमध्ये आरक्षण क्षेत्रातील सुमारे १३ गुंठे क्षेत्रात १ हजार ७०० स्क्वे.फूट मोफत बांधकाम पूर्ण करून नगरपंचायतला मालकी हक्काने ताब्यात देणारा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प आहे. याचे कौतुक करायचे सोडून राजकारणासाठी नीतेश राणे यांनी त्याला विरोध करणे चुकीचे आहे.या प्रकल्प मंजुरीची प्रक्रिया २ वर्षे सुरू होती. या प्रकल्पाला काही व्यक्तिनी विरोध केल्यानेच त्याला विलंब झाला. या प्रकल्पाबाबत मुंबई येथील मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ३ बैठका झाल्या. त्यानंतर सविस्तर चौकशीनंतरच या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. 500 चौरसमिटर पेक्षा इमारत बांधकाम कमी असेल तर अग्निशामक अधिकारी यांची परवानगीची आवश्यकता नसते. हे इथे लक्षात घेतले पाहिजे.

आमदार नितेश राणे यांची कणकवलीतील अवैध बांधकामविरोधातील भूमिका स्वागतार्ह आहे. मात्र , याची सुरुवात त्यांनी स्वतःच्या घरापासून करावी असेही म्हटले आहे. तसेच अजुन बरेच बोलता येईल. पण समोर पुरावे घेऊनच यापुढे आपण बोलेन,असेही त्यानी म्हटले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRajan Teliराजन तेली Nitesh Raneनीतेश राणे