शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या संकटामुळे कणकवली पर्यटन महोत्सव २०२१ रद्द !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 17:17 IST

Kankavli Tourism News- कणकवली नगरपंचायतीमार्फत मागील दोन वर्ष सातत्यपूर्ण पर्यटन महोत्सव करण्यात येत होता. या पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होत असतानाच कणकवलीकरांचे मनोरंजनही होत असे. मात्र , कोरोनाच्या संकटामुळे कणकवली पर्यटन महोत्सव २०२१ रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

ठळक मुद्देकणकवली पर्यटन महोत्सव २०२१ रद्द ! कोरोनाच्या संकटामुळे निर्णय घेतल्याची नगराध्यक्षांनी दिली माहिती

कणकवली : कणकवली नगरपंचायतीमार्फत मागील दोन वर्ष सातत्यपूर्ण पर्यटन महोत्सव करण्यात येत होता. या पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होत असतानाच कणकवलीकरांचे मनोरंजनही होत असे. मात्र , कोरोनाच्या संकटामुळे कणकवली पर्यटन महोत्सव २०२१ रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची मांदियाळी या पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने कणकवलीकरांना अनुभवता येत होती. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारीमध्ये घेण्यात येत असलेलाकणकवलीकरांसाठी राबवीत असलेला हा उपक्रम येत्या वर्षी खंडित होत आहे. त्याबद्दल कणकवलीरांची दिलगिरी व्यक्त करतो.मात्र, कोरोनाचे संकट संपल्यानंतर २०२२ मध्ये कणकवली पर्यटन महोत्सव पुन्हा एकदा दिमाखाने आणि भव्यदिव्य स्वरूपात साजरा करण्यात येईल.

कणकवली पर्यटन महोत्सवात गेल्या दोन वर्षात खाद्यसंस्कृती बरोबरच नामवंत कलाकारांची मांदियाळी कणकवलीकरांना याची देही याची डोळा अनुभवता आली होती. अनेक स्थानिक कलाकारांनाही या पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने व्यासपीठ उपलब्ध झाल्याने त्यांच्या कलागुणांना संधी मिळाली होती. पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात स्टॉलच्या माध्यमातून आर्थिक उलाढालही होत होती. यामुळे बचतगटांसह अनेक स्थानिकांना रोजगाराची ही संधी निर्माण झाली होती.मात्र, यावर्षीची कोरोनाचे संकट असल्यामुळे पर्यटन महोत्सवाला शासनाकडून परवानगी मिळण्याची शक्यता नाही. त्यातच पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढू शकतो. या साऱ्या पार्श्वभूमीवर २०२१ मधला कणकवली पर्यटन महोत्सव रद्द करून त्या पुढील वर्षात दिमाखदारपणे साजरा करण्यात येईल. कणकवलीकरांनी आतापर्यंत जसे सहकार्य केले अशीच साथ द्यावी, असे आवाहनही समीर नलावडे यांनी या प्रसिध्दीपत्रकातून केले आहे. 

टॅग्स :KankavliकणकवलीMuncipal Corporationनगर पालिकाsindhudurgसिंधुदुर्गtourismपर्यटन