शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली तालुका कृषी अधिकारीपद दोन वर्षे रिक्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 17:03 IST

Agriculture Sector kankvali sindhudurg- कणकवली तालुक्यातील कृषी विभागात अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे एकंदर कामकाजावर परिणाम होत आहे. कणकवली तालुका कृषी अधिकारीपद गेली दोन वर्षे तर उपविभागीय कृषी अधिकारीपद वर्षभराहून अधिक काळ रिक्त आहे. या दोन्ही पदांवर एकच अधिकारी प्रभारी म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे ही रिक्त पदे कधी भरली जाणार? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देकणकवली तालुका कृषी अधिकारीपद दोन वर्षे रिक्तच योजना राबविताना येत आहेत अडचणी; रिक्त पदे भरण्याची मागणी

कणकवली : तालुक्यातील कृषी विभागात अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे एकंदर कामकाजावर परिणाम होत आहे. कणकवली तालुका कृषी अधिकारीपद गेली दोन वर्षे तर उपविभागीय कृषी अधिकारीपद वर्षभराहून अधिक काळ रिक्त आहे. या दोन्ही पदांवर एकच अधिकारी प्रभारी म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे ही रिक्त पदे कधी भरली जाणार? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.तालुका कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले राठोड यांची दोन वर्षापूर्वी बदली झाली. त्यानंतर तालुका कृषी अधिकारीपद रिक्त आहे. तर उपविभागीय कृषी अधिकारीपदी कार्यरत असलेले बागल यांची बदली झाल्यानंतर गेल्या वर्षभराहून अधिक काळ जात आहे . ते उपविभागीय कृषी अधिकारीपदही रिक्त आहे. तंत्र अधिकारी हजारे यांच्याकडे तालुका कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी या दोन्ही पदांचा प्रभारी पदभार गेल्या वर्षभरापासून आहे .सांगवे, कणकवली व तळेरे या तीन ठिकाणी मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयात एक अशी चार पदे मंजूर आहेत. यापैकी केवळ तळेरे येथे एकमेव पद भरलेले आहे. उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी ही पदे रिक्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी योजनांबाबत माहिती मिळविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कृषी विभागातील ही रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग