शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
3
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
4
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
5
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
6
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
7
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
8
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
9
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
10
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
11
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
12
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
13
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
14
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
15
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी
16
विलीनीकरण नव्हे, एकत्र काम करणार! शरद पवारांनी दिला चर्चेला पूर्णविराम; 'इंडिया'ला महाराष्ट्रात प्रचंड समर्थन
17
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
18
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
19
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
20
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)

कणकवली : भारत बंदला सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद , कणकवली शहरातून रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 1:37 PM

देशाची आर्थिक पारतंत्र्याकडील वाटचाल रोखण्यासाठी गुरुवारी भारत बंद पुकारण्यात येणार असल्याचे व्यापारी संघटनांकडून जाहिर करण्यात आले होते.  विविध संघटनानी त्याला पाठिंबा दिला होता. कणकवली  शहरासह जिल्ह्यात या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला

ठळक मुद्देव्यापाऱ्यांचे तहसिलदाराना निवेदनजिल्ह्यात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात

कणकवली : देशाची आर्थिक पारतंत्र्याकडील वाटचाल रोखण्यासाठी गुरुवारी भारत बंद पुकारण्यात येणार असल्याचे व्यापारी संघटनांकडून जाहिर करण्यात आले होते.  विविध संघटनानी त्याला पाठिंबा दिला होता. कणकवली  शहरासह जिल्ह्यात या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तर व्यापाऱ्यानी कणकवली शहरातून सकाळी 10 वाजता रॅली काढली. तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार संजय पावसकर यांना दिले.        

या भारत बंदच्या पार्श्वभूमिवर कणकवली तालुका व्यापारी महासंघाच्या पुढाकाराने सर्व व्यापारी, व्यावसायिक , छोटे विक्रेते यांनी एकत्र येत रॅली काढली. परमहंस भालचंद्र महाराज संस्थान येथून बाजारपेठ मार्गे महामार्गावरूनकणकवली तहसील कार्यालयापर्यन्त ही रॅली काढण्यात आली.

यावेळी कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष विशाल कामत, महेश नार्वेकर, राजन पारकर, आनंद पोरे,  यशवंत खोत, राजेश राजाध्यक्ष,  सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर, हॉटेल व्यावसायिक शेखर गणपत्ये, विलास कोरगावकर, उदय वरवडेकर, अनिल डेगवेकर  निवृत्ती धडाम, दीपक बेलवलकर,मोहन तळगावकर,नितीन पटेल, कपूर,प्रभाकर कोरगावकर,विलास कोरगावकर,प्रशांत साटविलकर, बापू पारकर,महेश कुडाळकर,नंदू आळवे, प्रशांत अंधारी आदी उपस्थित होते.            याबंद मध्ये कणकवली तालुका व्यापारी संघाने सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये किराणा दूकानदार , कापड़ व्यावसायिक , हॉटेल व बार व्यावसायिक, फळ भाजी विक्रेते, बेकरी, सुवर्णकार , सलून व्यावसायिक , पानपट्टी चालक तसेच इतर व्यावसायिकही सामिल झाले होते. त्यामुळे कणकवलीत शुकशुकाट पसरला होता. तहसील कार्यालयाजवळ रॅली आल्यानंतर व्यापऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.  सिंधुदुर्ग जिल्ह्यात इतर ठिकाणिहि बंदला चांगला प्रतिसाद लाभला. बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्याने सर्वत्र शुकशुकाट पसरला होता.

कड़क पोलिस बंदोबस्त !

बंदच्या पार्श्वभूमिवर कणकवली शहरासह तालुक्यात कड़क पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथके तैनात करण्यात आली होती. जिल्ह्यात इतर ठिकाणिहि पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कणकवली तहसीलदार संजय पावसकर यांना व्यापाऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

टॅग्स :StrikeसंपMedicalवैद्यकीय