कणकवलीत पावसाने उडविली दाणादाण
By Admin | Updated: May 31, 2017 13:48 IST2017-05-31T13:48:07+5:302017-05-31T13:48:07+5:30
वीजपुरवठा खंडित : खारेपाटण फिडरमध्ये बिघाड

कणकवलीत पावसाने उडविली दाणादाण
आॅनलाईन लोकमत
कणकवली, दि. ३१ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून सुरु झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कणकवली तालुक्यात तर या पावसामुळे अनेक ठिकाणच्या वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे रात्रभर नागरिकांना अंधारात रहावे लागले.
कणकवली तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने सर्वत्र दाणादाण उडवून दिली. सह्याद्री खोऱ्यातील पट्ट्यात मोठा पाउस झाल्यामुळे तालुक्यात सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेक नद्यांचे पाण्याचे प्रवाहही वाहते झाले. वादळवाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी विज वितरण कंपन्यांमार्फत पुरविण्यात येणारा विजेचा पुरवठाही खंडित झाला आहे. यामुळे नागरिकांना रात्रभर अंधारात बसावे लागले.
कणकवली तालुक्यातील ग्रामीण भागाला वीजपुरवठा करणाऱ्या १३२ केव्हीच्या खारेपाटण येथील फिडरमध्येच मंगळवारी सायंकाळीच बिघाड झाला. यामुळे रात्रभर अंधाराचे साम्राज्य होते. वीजवितरण कंपनीला बुधवारी दुपारी साडेबारा वाजेपर्यंतही हा वीजपुरवठा सुरळीत करता आला नाही.