शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत पावणेदोन लाखांची दारू जप्त, दोघा तरुणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 17:11 IST

मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली एस. एम. हायस्कूलसमोर नाकाबंदी दरम्यान वाहनांची तपासणी करताना पोलिसांनी लक्झरीमधून १ लाख ७५ हजार ५४० रुपये किमतीचे गोवा बनावटीच्या दारुच्या बाटल्या असलेले ५३ बॉक्स जप्त केले आहेत. तसेच गैरकायदा दारू वाहतूक केल्याप्रकरणी दोघा तरुणांनाही अटक केली असून दारू वाहतुकीसाठी वापरलेली ३५ लाख रुपये किमतीची लक्झरीही जप्त केली आहे. ही कारवाई शनिवारी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

ठळक मुद्दे कणकवलीत पावणेदोन लाखांची दारू जप्तदोघा तरुणांना अटक: ३५ लाखांची लक्झरीही ताब्यात

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली एस. एम. हायस्कूलसमोर नाकाबंदी दरम्यान वाहनांची तपासणी करताना पोलिसांनी लक्झरीमधून १ लाख ७५ हजार ५४० रुपये किमतीचे गोवा बनावटीच्या दारुच्या बाटल्या असलेले ५३ बॉक्स जप्त केले आहेत. तसेच गैरकायदा दारू वाहतूक केल्याप्रकरणी दोघा तरुणांनाही अटक केली असून दारू वाहतुकीसाठी वापरलेली ३५ लाख रुपये किमतीची लक्झरीही जप्त केली आहे. ही कारवाई शनिवारी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.दरम्यान, कणकवली पोलिसांनी धडक कारवाई करीत दारूसह लक्झरी बस असा ३६ लाख ७५ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, कणकवली पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कदम, हवालदार गुरुनाथ नाईक, विश्वास नारनवर, रवींद्र बाईत, राकेश चव्हाण आदींच्या पथकाने शनिवारी रात्री मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली एस. एम. हायस्कूल येथे नाकाबंदी केली होती. महामार्गावरून जाणारी वाहने तपासत असताना रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास गोव्यावरून मुंबईला जाणारी आत्माराम ट्रॅव्हल्सची लक्झरी बस तिथे आली.या लक्झरीचा चालक ज्ञानेश्वर दामोदर ताटकेरे (३६, रा. लांजा, रत्नागिरी) याच्याजवळ वाहन चालविण्याचा परवाना आहे का? अशी विचारणा पोलिसांनी केली. तसेच लक्झरीची डिकी उघडून दाखवायला सांगितले. डिकी उघडली असता त्यामध्ये काही पुठ्ठ्याचे बॉक्स आढळून आले. त्याबाबत पोलिसांना संशय आला.

त्यामुळे चालकाजवळ विचारणा केली असता त्याने लक्झरीतून प्रवास करणारे शिवलखन मोतीलाल केवट (२४) व रज्जन इंद्रलाल केवट (२०, दोन्ही राहणार मध्यप्रदेश) यांचे ते बॉक्स असल्याचे सांगितले. त्या दोघा तरुणांकडे पोलिसांनी चौकशी केली असता मुंबई -अंधेरी पूर्व येथील जिगर रब्जी पटेल याचे फिनेलचे कॅन त्या बॉक्समध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गोवा येथे आपल्याकडे ते दिले असून पाल्स रॉयल इन्व्हेंटर अँड प्रमोटर्स प्रा. लि. या कंपनीचे बिलही त्यांनी दाखविले.मात्र, पोलिसांना संशय आल्याने त्यांनी ते बॉक्स उघडून पाहिले. त्या बॉक्समध्ये विविध कंपन्यांच्या बिअरच्या तसेच पांढऱ्या रंगाचे द्रावण असलेल्या बाटल्या व गोवा बनावटीच्या दारुच्या बाटल्या आढळून आल्या. त्यामुळे त्या दोन्ही तरुणांना बिगरपरवाना गैरकायदा दारू वाहतूक केल्याप्रकरणी ताब्यात घेत लक्झरीसह सर्व माल जप्त करण्यात आला. अधिक चौकशी केल्यानंतर त्या दोघा तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.या प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात हवालदार विश्वास नारनवर यांनी तक्रार नोंदविली आहे. अधिक तपास पोलीस करीत असून गाडीच्या मालकासह त्या तरुणांकडे दारू देणाऱ्या व्यक्तीला संपर्क करून चौकशीसाठी कणकवलीत बोलविण्यात आले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. 

टॅग्स :liquor banदारूबंदीsindhudurgसिंधुदुर्ग