शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली पंचायत समितीचे आरक्षण जाहीर, अनेक इच्छुकांना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 17:11 IST

कणकवली तालुक्यातील पंचायत समितीच्या १८ गणातील सदस्यांकरिता ही सोडत काढण्यात आली

कणकवली : कणकवली पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता आरक्षण सोडत प्रक्रिया आज, गुरुवारी येथील तहसीलदार कार्यालयात पार पडली. अध्यासी अधिकारी अमोलसिंह भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राधिकृत अधिकारी तहसीलदार आर. जे. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरक्षण सोडत काढण्यात आल्या. आरक्षण सोडतीनंतर निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेल्या अनेकांना मोठा धक्का बसला आहे.कणकवली तालुक्यातील पंचायत समितीच्या १८ गणातील सदस्यांकरिता ही सोडत काढण्यात आली. यामध्ये ९ सदस्य हे महिला तर २ अनुसूचित जातीसाठी असून त्यापैकी एक अनुसुचित जातीतील महिलांसाठी राखीव असेल.  नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ४ गण आरक्षित झाले असून त्यापैकी २ महिलांसाठी आरक्षित तर सर्वसाधारण प्रवर्गातील १२ पैकी ६ महिलांसाठी राखीव गण अशी आरक्षण सोडत काढण्यात आली.     असे आहे नवीन आरक्षण !कलमठ पंचायत समिती गण -अनुसूचित जाती महिला, सांगवे -अनुसूचित जाती, हरकुळ खुर्द व फोंडा - नागरिकांचा मागास प्रवर्ग ,  खारेपाटण व सावडाव- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, लोरे, वारगाव, कासार्डे, नांदगाव, ओसरगाव व नाटळ - सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत. तर वरवडे, वागदे, तळेरे, जानवली, कळसूली व हरकुळ बुद्रुक - सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले असणार आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गpanchayat samitiपंचायत समितीreservationआरक्षणElectionनिवडणूक