शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 13:17 IST

Kankavali Local Body Election Result 2025: कुटुंब एकाबाजूला होते आणि निवडणूक एका बाजूला होती. कणकवलीसह मालवणमध्येही ज्यांनी आमच्या विजयात हातभार लावला त्यांचे आणि जनतेचे आभारी आहोत असं नीलेश राणेंनी सांगितले.

कणकवली - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपालिकेच्या निवडणूक निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत भाजपाविरोधात सर्वपक्षीय शहर विकास आघाडी बनवण्यात आली. त्यात पालकमंत्री नितेश राणे आणि शिंदेसेनेचे आमदार नीलेश राणे यांच्यात प्रतिष्ठेची लढाई झाली. या निवडणुकीत शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर विजयी झाले आहेत. पारकर यांच्या विजयाने मंत्री नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे. 

या निकालावर नीलेश राणे म्हणाले की, हा विजय एकट्याचा नाही तर जनतेचा विजय आहे. आजचा दिवस विजयाच आहे. एका डोळ्यात आनंद आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहे अशी भावना आहे. आम्ही शहर विकास आघाडी म्हणून लढलो असलो तरी भाजपाचा पराभव झाला आहे. मालवणमध्ये आम्ही जिंकलो त्याचा आनंद आहे. सोबतच कणकवली आमचे काही लोक पराभूत झाले त्याचे दु:खही आहे. संदेश पारकर जिंकले त्याबद्दल अभिनंदन, परंतु समोरही आपलेच होते. नात्यातले होते. कुटुंब एकाबाजूला होते आणि निवडणूक एका बाजूला होती. मालवणमध्येही ज्यांनी आमच्या विजयात हातभार लावला त्यांचे आणि जनतेचे आभारी आहोत असं त्यांनी सांगितले.

भाजपाविरोधात शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र आल्याची चर्चा

कणकवली येथील या निवडणुकीत भाजपाविरोधात शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र आल्याचे चित्र राज्याने पाहिले. या निवडणुकीत भ्रष्टाचाराविरोधात आमची लढाई आहे असं सांगत शहर विकास आघाडी बनवण्यात आली. त्यात कधी काळी ठाकरे गटाचे नेते असलेले संदेश पारकर यांना नगराध्यक्षपदाचे उमेदवार बनवले होते. त्यात शिंदेसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. नीलेश राणे यांनी शहर विकास आघाडीचा प्रचार करताना थेट भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला होता. चव्हाणांमुळे महायुती झाली नाही असा आरोपही त्यांनी केला होता.

पैसेवाटपाचा आरोप

या निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात नीलेश राणे यांनी भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरात जात स्टिंग ऑपरेशन केले होते. यात भाजपा मतदारांना पैसे वाटप करत असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. या बातमीने महायुतीत शिंदेसेना आणि भाजपा यांच्यात तणाव वाढला होता. नीलेश राणे यांनी थेट चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे कणकवली निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. त्यात नगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी झाले. एकूण १५ जागांपैकी ८ जागांवर भाजपाने विजय मिळवला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kankavali Election Shocks Rane; Shahar Vikas Aghadi Wins

Web Summary : In Kankavali, Shahar Vikas Aghadi's Sandesh Parkar defeated BJP amid a united opposition. Nilesh Rane alleges corruption, celebrating victory and lamenting losses. Tensions rise within the ruling coalition.
टॅग्स :Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Maharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२५BJPभाजपाNitesh Raneनीतेश राणे Nilesh Raneनिलेश राणे