शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे आंदोलन तूर्तास स्थगित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 20:14 IST

Muncipal Corporation, sindhudurg, kankavli कणकवली नगरपंचायतचे कर्मचारी सतीश कांबळे यांना विरोधी पक्षातील नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी अपमानस्पद वागणूक दिली. असा आरोप करीत नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून कामबंद आंदोलन छेडले होते . याप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्या सूचनेनुसार नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कर्मचारी संघटनेशी चर्चा करत यशस्वी शिष्टाई केली. त्यानंतर नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन गुरुवारी तूर्तास स्थगित केले आहे.

ठळक मुद्देबुधवार पासून केले होते कामबंद विरोधी नगरसेवकांनी अपमानास्पद वागणूक दिल्याची घटना

कणकवली : कणकवली नगरपंचायतचे कर्मचारी सतीश कांबळे यांना विरोधी पक्षातील नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी अपमानस्पद वागणूक दिली. असा आरोप करीत नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून कामबंद आंदोलन छेडले होते . याप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्या सूचनेनुसार नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कर्मचारी संघटनेशी चर्चा करत यशस्वी शिष्टाई केली. त्यानंतर नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन गुरुवारी तूर्तास स्थगित केले आहे.दरम्यान, जनहितासाठी आम्ही हे आंदोलन मागे घेत आहोत, मात्र, पुन्हा असे कृत्य घडल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. असे कर्मचारी संघटनेने स्पष्ट केले आहे. नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सकाळी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची भेट घेतली . यावेळी नलावडे यांनी घडलेला प्रकार आमदार नितेश राणे यांच्यापर्यंत पोचवण्यात आला असून , नागरिकांची कामे रखडू नयेत यादृष्टीने आपण काम बंद आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन कर्मचारी संघटनेला केले.विरोधी नगरसेवकांकडून असे प्रकार सुरू असताना आपल्याला जनता केंद्रस्थानी ठेवून काम करायचे आहे . सत्ताधारी म्हणून या घटनेचा मी निषेध करतो . पण असे प्रकार पुन्हा घडले तर आम्ही कर्मचाऱ्यांसोबत राहणार असल्याचे आश्वासन समीर नलावडे यांनी यावेळी दिले .

एका विरोधी नगरसेवकाच्या चुकीमुळे कणकवली शहरातील जनतेला आपण वेठीस धरू नये . कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन छेडले तर कणकवली शहरातील जनतेची कामे पडून राहणार आहेत . त्यामुळे शहराचे व जनतेचे नुकसान होणार आहे . असे सांगत नितेश राणे यांनी हे आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कर्मचारी संघटनेला दिली .त्यानंतर कर्मचारी संघटनेच्यावतीने काम बंद आंदोलन मागे घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे , नगरसेवक अभिजीत मुसळे , नगरपंचायत कर्मचारी संघटनेचे किशोर धुमाळे , मयूर शिंदे , मनोज धुमाळे , प्रियांका सोंसुरकर , सतीश कांबळे , अमोल भोगले , विभव करंदीकर आदी उपस्थित होते .

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाsindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली