शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
4
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
5
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
6
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
7
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
8
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
9
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
10
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
11
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण
12
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
13
वाद-प्रतिवाद सुरू असलेल्या भारताला आज स्वीकारमंत्र अंगीकारण्याची गरज -मोरारीबापू
14
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
15
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
16
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
17
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
18
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
19
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
20
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल

कणकवलीतील महामार्गाचे काम बंद पडणार, नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 17:28 IST

कणकवली शहरातील महामार्ग चौपदरीकरणा अंतर्गत अनेक कामे आश्वासन देऊनही अद्याप पूर्ण झालेली नाहीत . ही कामे येत्या दोन दिवसात पुर्ण न केल्यास गुरुवारपासून शहरातील चौपदरीकरणाचे काम बंद पाडणार असल्याचा इशारा नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह नगरपंचायतीतील सत्ताधारी नगरसेवकांनी दिला आहे.

ठळक मुद्देनगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह नगरपंचायतीतील सत्ताधारी नगरसेवकांचा इशाराकामे अपूर्ण असल्याने घेतला पवित्रा

कणकवली : कणकवली शहरातील महामार्ग चौपदरीकरणा अंतर्गत अनेक कामे आश्वासन देऊनही अद्याप पूर्ण झालेली नाहीत . ही कामे येत्या दोन दिवसात पुर्ण न केल्यास गुरुवारपासून शहरातील चौपदरीकरणाचे काम बंद पाडणार असल्याचा इशारा नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह नगरपंचायतीतील सत्ताधारी नगरसेवकांनी दिला आहे.कणकवली शहरातील पावसाळी कामाच्या नियोजनाची बैठक कणकवली नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्षांच्या दालनात सोमवारी आयोजित करण्यात आली होती.

यावेळी उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड , बांधकाम सभापती संजय कामतेकर , आरोग्य सभापती प्रतिक्षा सावंत, महिला व बालकल्याण सभापती उर्मी जाधव, नगरसेवक अबीद नाईक, ऍड. विराज भोसले, अभिजीत मुसळे , महेंद्र सांब्रेकर , बंडू हर्णे, सुमेधा अंधारी , मेघा सावंत, मानसी मुंज तसेच नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.कणकवली शहरात महामार्ग ठेकेदाराने केलेल्या अपूर्ण कामांमुळे पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता आहे. याबाबत ठेकेदाराला आणि महामार्ग प्राधिकरणाला कळवून देखील कामे पूर्ण झालेली नाहीत. महामार्गाच्या दुतर्फा असलेली गटारे अपूर्ण आहेत. तसेच पथदीपही बसवण्यात आलेले नाहीत.

चौपदरीकरणात येणाऱ्या नाले तसेच पाइपलाईनची सफाईही अद्याप करण्यात आलेली नाही. त्यापेक्षा मोठा कहर म्हणजे ठेकेदाराच्या प्रतिनिधींनी तर दुरध्वनी उचलणे बंद केले आहे.पावसाळ्यात योग्य प्रकारे पाणी निचरा न झाल्यास अनेक घरे , दुकाने यांच्यामध्ये चिखलयुक्त पाणी जाण्याचा धोका आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनीने येत्या दोन दिवसात शहरातील कामे पूर्ण करावीत.

अन्यथा गुरुवारपासून शहरात सुरू असलेले चौपदरीकरणाचे काम बंद पाडू असा इशारा नगराध्यक्ष आणि उपस्थित सत्ताधारी नगरसेवकांनी यावेळी दिला. तसेच त्याबाबतचे पत्र महामार्ग प्राधिकरण , प्रांताधिकारी, कणकवली पोलीस ठाणे याना देण्याचेही यावेळी ठरविण्यात आले.शहरातील नाले व गटार सफाई तसेच नवीन गटार मारणे आदी कामांचा यावेळी ठेकेदाराकडून आढावा घेण्यात आला. तसेच नगरसेवकांनी काही नवीन कामेही यावेळी सुचविली. नगरसेवक अबीद नाईक, संजय कामतेकर, बंडू हर्णे यांनी आपल्या प्रभागातील कामे यावेळी ठेकेदाराला सांगितली .नगरपंचायत रोड, पटकीदेवी ते हॉर्नबिल हॉटेल, तेलीआळी डीपी रोड ते पंचायत समिती येथील गटारे, विद्यानगर मधील कॉलेजमागील मोठा नाला, कॉलेज रोडची गटारे, शिवाजीनगर ते परबवाडी दरम्यानचा मोठा नाला साफ केल्याची माहिती यावेळी ठेकेदार मिथुन ठाणेकर यांनी दिली. तर ढालकाठी दरम्यानची चार चेंबर तत्काळ साफ करण्यात यावीत अशी मागणी नगरसेवक अबीद नाईक यांनी केली.शिवाजीनगर परिसरात ११ केव्हीचा वीज पुरवठा गटारातून विजवीतरणकडून निवासी इमारतींना अंडरग्राउंड करण्यात आला आहे. त्यामुळे गटार सफाई करताना अडचण निर्माण होत असून कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो.याकडे नगरसेवकांनी लक्ष वेधले.यावेळी विजवीतरण कंपनीशी याबाबत तत्काळ पत्रव्यवहार करण्यात यावा. तसेच वीज वाहिनी मुळे काही दुर्घटना घडल्यास त्याला वीज विरणच जबाबदार राहील असेही त्यांना कळविण्यात यावे.असे आदेश नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी नगरपंचायत प्रशासनास दिले.पांगम बिल्डरने जळकेवाडीत नैसर्गिक ओहोळ अरुंद केला आहे. त्यामुळे पावसाळ्यात त्याचा फटका नागरिकांना बसणार आहे. त्याबाबत संबधित बिल्डरला नोटीस देण्यात यावी असेही नलावडे यांनी यावेळी सांगितले.नरडवे रोड ते रेल्वे स्टेशन दरम्यानच्या पदपथावर खड्डे पडले असून तिथे दुर्घटना घडू शकते.असे मानसी मुंज यांनी सांगितले. त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करा.असे नलावडे यांनी प्रशासनास सांगितले.टेंबवाडीतील सार्वजनिक विहिरीचा गाळ काढण्याची सूचना नगरसेविका मेघा सावंत तसेच नगरसेवक अभिजित मुसळे यांनी केली. त्याला नगराध्यक्षानी सहमती दर्शविली. तसेच शहरातील सर्व नाले व गटारे लवकरात लवकर स्वच्छ करा असे आदेश नगराध्यक्ष नलावडे यांनी यावेळी ठेकेदाराला दिले.शहरातील नाले, गटारांची साफसफाई !पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक नाले व गटारे साफ करण्यात आले आहेत. अजूनही काम सुरू असून पाणी साचण्याची संभाव्य ठिकाणे लक्षात घेऊन नागरिक तसेच नगरसेवकांनी अजूनही काही ठिकाणची नाले सफाई करायची असल्यास ती ठिकाणे सुचवावीत असे आवाहन यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले.आपत्कालीन समिती नेमणार !पावसाळ्यात शहरात पाणी साचून आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास तत्काळ कार्यवाही करण्यासाठी नगरसेवक तसेच नगरपंचायत कर्मचारी यांची आपत्कालीन समिती नेमण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी ही समिती जेसीबी तसेच इतर सामुग्रीच्या सहाय्याने काम करेल असेही यावेळी ठरविण्यात आले. पावसाळ्यात नगरपंचायतची आपत्कालीन व्यवस्था असावी अशी सूचना नगरसेवक अभि मुसळे यांनी या बैठकीत केली होती. 

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग