शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

विज्ञान केंद्राला कल्पना चावलाचे नाव

By admin | Published: March 09, 2015 8:14 PM

सावंतवाडी नगर परिषद व महिला विकास मंडळ, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन --नगराध्यक्ष बबन साळगावकर

सावंतवाडी : सावंतवाडी शहरात होणाऱ्या विज्ञान केंद्राला भारताची पहिली अंतराळवीर कल्पना चावला हिचे नाव देण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी जाहीर केले. सावंतवाडी नगर परिषद व महिला विकास मंडळ, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन रविवारी साजरा करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष साळगावकर बोलत होते. यावेळी मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे, नगरसेविका अनारोजीन लोबो, महिला व बालकल्याण सभापती वैशाली पटेकर, साहित्यिका वंदना करंबेळकर, शुभांगी सुकी, कीर्ती बोंद्रे, शर्वरी धारगळकर, अफरोज राजगुरू, साक्षी कुडतरकर आदी उपस्थित होते. आजच्या युगात महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. पोलीस अधीक्षक, शासकीय अधिकारी, संशोधन क्षेत्रात, क्रीडा क्षेत्र अशा विविध क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. त्यामुळे महिलांनी आपण पुरुषांच्या मागे आहोत, असा न्यूनगंड मनात न बाळगता आपली कामगिरी सुरू ठेवावी, असे आवाहन नगराध्यक्ष साळगावकर यांनी केले. महिलांसाठी अनेक कायदे आहेत. मात्र, कायद्यांची समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत जनजागृती होणे आवश्यक आहे. जोपर्यंत या महिलांमध्ये कायदेविषयक जनजागृती होत नाही, तोपर्यंत या कायद्यांचा काहीही उपयोग नाही, असे महिला व बालकल्याण सभापती वैशाली पटेकर यांनी सांगितले. (वार्ताहर) महिलांचा सत्कारमहिलांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत त्यांचे सत्कार करण्यात आले. यामध्ये कवयित्री कल्पना बांदेकर, शिक्षिका मेघना राऊळ, कवयित्री शरयू आसोलकर, धाडसी नेतृत्व नम्रता केसरकर, उत्तम खासगी उपहारगृहचालक अनिता रसाळ, अर्चना अरविंद नार्वेकर, कवयित्री उषा परब व महिलांचा सत्कार करण्यात आला. तसेच क्रीडाक्षेत्रातील अमेय मोरजकर, शिष्यवृत्ती उत्तीर्ण पार्थ शंतनू तेंडुलकर, अंबर नागेश गावडे या सर्वांचा सत्कार करण्यात आला.