शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurga: मच्छी विक्रेत्या महिलेकडून कलमठ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास मारहाण, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 16:38 IST

रस्त्यालगत बसलेल्या मच्छी विक्रेतीला हटविण्यास गेले असता, तिने त्यांना शिवीगाळ करत हाताच्या थापटाने मारहाण केली

कणकवली :  कलमठ-आचरा रस्त्यालगत बसलेल्या मच्छी विक्रेत्या सपना शिरसाट या महिलेला तेथून हटवण्यास गेलेल्या ग्रामपंचायत कर्मचारी गौरव तांबे याला त्या महिलेने मारहाण केली. हा प्रकार शुक्रवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी त्या महिलेवर पोलिसांकडून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मच्छी विक्रेत्याची ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला मारहाण करण्याची मजल गेल्याने कलमठ ग्रामपंचायतीने याची गंभीर दखल घेतली आहे. कलमठ-आचरा रस्त्यालगत अनधिकृतपणे काही मच्छी विक्रेते बसतात. त्यांच्यावर अधून-मधून  कलमठ ग्रामपंचायतीतर्फे कारवाईचा बडगा उगारला जातो. कारवाई झाल्यानंतर काही दिवसात ते विक्रेते पुन्हा रस्त्यालगत मच्छी विक्रीचा व्यवसाय सुरू करतात.शुक्रवारी ग्रामपंचायत कर्मचारी गौरव तांबे हे रस्त्यालगत बसलेल्या सपना शिरसाट या महिला मच्छी विक्रेतीला हटविण्यास गेले असता, तिने त्यांना शिवीगाळ करत हाताच्या थापटाने मारहाण केली. हा प्रकार सरपंच संदीप मेस्त्री यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत कणकवली पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिस त्या ठिकाणी आले आणि मारहाण करणा़ऱ्या त्या महिलेला ताब्यात घेत पोलिस ठाण्यामध्ये नेले. मारहाण झालेल्या व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनुसार सपना शिरसाट हिच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.या कारवाईवेळी ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर, ग्रामपंचायत सदस्य नितीन पवार, श्रेयश चिंदरकर, स्वरूप कोरगावकर, समर्थ कोरगावकर, सोमनाथ पारकर, ग्रामपंचायत कर्मचारी दीपक गुरव, खुशाल कोरगावकर, मंगेश कदम, रूपेश कदम, मोहन कदम, प्रतीक उकिर्डे आदी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारी