काका कुडाळकरांचा राजीनामा
By Admin | Updated: April 20, 2016 01:15 IST2016-04-19T23:15:35+5:302016-04-20T01:15:03+5:30
भाजप प्रवक्तेपद : नगरपंचायत पराभवाची घेतली जबाबदारी

काका कुडाळकरांचा राजीनामा
कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपच्या झालेल्या दारूण पराभवाची जबाबदारी स्वीकारत भाजपचे जिल्हा प्रवक्ते काका कुडाळकर यांनी आपला भाजप जिल्हा प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती कुडाळकर यांनी दिली.
शतप्रतिशत भाजपच, पार्लमेंट टू नगरपंचायत अशाप्रकारचा नारा घेऊन कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उतरलेल्या भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीच्या प्रचारातही मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली होती. मोठ्या प्रमाणात प्रचारासाठी भाजपाचे नेते, पदाधिकारी आले होते. विशेष म्हणजे स्वबळावर भाजपा ही निवडणूक लढवित होती. तसेच या निवडणुकीची सर्वस्वी जबाबदारी पक्षाचे जिल्हा प्रवक्ते व कुडाळातील पदाधिकारी काका कुडाळकर यांच्याकडे होती.
निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मात्र भाजपाला १७ जागांपैकी केवळ एका जागेवर विजय संपादन करता आला. त्यामुळे भाजपाच्या कुडाळ नगरपंचायतीमध्ये झालेल्या या दारूण पराभवाची जबाबदारी काका कुडाळकर यांनी स्वीकारत आपल्या जिल्हा प्रवक्तेपदाचा राजीनामा भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्याकडे दिला आहे. (प्रतिनिधी)
राजीनामा मंजूर की नामंजूर?
कुडाळकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असला, तरी तो राजीनामा आता जिल्हाध्यक्ष जठार मंजूर क रणार की नाही, याक डे भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.