शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश
2
मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर काहीतरी भव्य दिव्य होणार; 10 हजार पाहुणे, स्थळ अन् तारीखही ठरली...
3
निकालाआधीच कोल्हापूरात विजयाची चर्चा, शाहू महाराजांचे झळकले पोस्टर
4
"भाजपाने सत्तेसाठी इतरांची सरकारं पाडली, कुटुंबांमध्ये भांडणं लावली"; अखिलेश यादवांची टीका
5
'मोदी 3.0', Exit Poll वर पाकिस्तान, रशिया, चीन, सौदीसह जगभरातील मीडियाने काय म्हटले?
6
आरोग्यासाठी फायदेशीर असणारं लिंबू पाणी नेमकं कधी प्यावं?; जाणून घ्या, योग्य वेळ
7
धावत्या CNG कारला लागली आग; 4 जणांचा होरपळून मृत्यू, नेमकी कुठे चूक झाली..?
8
शेअर बाजार 'रेकॉर्ड हाय'वर बंद; 'Modi Stocks'नं एकाच दिवसात केलं मालामाल, अदानींचे शेअर्स रॉकेट
9
दलजीतविरोधात निखिल पटेलची कायदेशीर कारवाई, पत्नीला थेट इशारा देत म्हणाला...
10
सरकार बनताच अॅक्शन मोडमध्ये येणार मोदी! बँकेसह या कंपनीतील हिस्सा विकण्याचा प्लान; शेअर्स बनले रॉकेट
11
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अंतरवाली सराटीतूनच विरोध, गावकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र 
12
हिमाचल प्रदेशमध्ये ३ अपक्ष आमदारांचा राजीनामा मंजूर, आता या मतदारसंघात होणार पोटनिवडणूक
13
निकालाआधीच दिल्लीत हालचालींना वेग! नितीश कुमार यांनी पीएम मोदींची घेतली भेट, अमित शहा यांचीही भेट घेणार
14
शिवसेना तोडली, पण उद्धव ठाकरेंना संपवू शकले नाहीत; महाराष्ट्राचा एक्झिट पोल, भाजपाला सतावणारा
15
सर्वांनी माघार घेतली तर उमेदवार-नोटामध्ये निवडणूक का नाही? आयुक्त राजीव कुमारांनी केले स्पष्ट
16
Lipi Rastogi Suicide Note : मुंबईत आयएएस दाम्पत्याच्या मुलीची आत्महत्या, 'सुसाइड नोट'मध्ये काय? आलं समोर...
17
"आश्वासक बदल दिसला नाहीतर मी..."; CM शिंदेंचा उल्लेख करत शरद पवारांचा सरकारला इशारा
18
"कोणी केले सांगा, आम्ही त्यांना शिक्षा देऊ"; अमित शाह यांनी धमकावल्याच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
19
भारतातल्या पहिल्या निवडणुकीच्या मास्टरमाईंडवर येतोय सिनेमा, विद्या बालनच्या पतीची मोठी घोषणा
20
विजयापूर्वीच जल्लोषाची तयारी, पंतप्रधानांच्या निवासस्थानापासून भाजपा कार्यालयापर्यत होणार रोड शो  

वृक्षतोडीविरोधात आवाज उठवणा-या जयंत बरेगारांचे उपोषण मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2018 2:10 PM

सावंतवाडी व दोडामार्गमधील २५ गावात बंदी असतानाही वृक्षतोड करण्यात आली आहे.

सावंतवाडी : सावंतवाडी व दोडामार्गमधील २५ गावात बंदी असतानाही वृक्षतोड करण्यात आली आहे. या विरोधात वनविभागाने कठोर कारवाई करावी तसेच या विरोधात वनविभागाने न्यायालयात अवमान याचिका दाखल करावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी येथील सावंतवाडी वनविभागाच्या मुख्य कार्यालयासमोर शनिवारी सकाळ पासून उपोषण सुरू केले होते ते रात्री उशिरा मागे घेतले.यात जिल्हाधिकारी याच्या सोबत बैठक घेउन योग्य तो मार्ग काढू असे आश्वासन उपवनसंरक्षक चव्हाण यानी दिले तसेच बरेगार याच्याकडून आठवड्याची मुदत घेतले आहे तर बरेगार यानी वनविभागाने अवमान याचिका दाखल करावी अन्यथा वनविभागा विरोधात न्यायालयात जाईन असा इशारा दिला आहे.सावंतवाडी व दोडामार्ग या दोन तालुक्यातील २५ गावांमध्ये बंदी क्षेत्र आहे. असे असतानाही या बंदी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. उच्च न्यायालयात याबाबतची याचिका दाखल आहे. त्याची सुनावणी सुरू आहे. मात्र येथील वनविभागाने न्यायालयाची दिशाभूल केली आहे. न्यायालयाने वृक्षतोडीचा अहवाल मागितला तसेच प्रत्यक्ष पाहणी करण्यास सांगितली, पण कोणतीही पाहाणी करण्यात आली नाही.येथील उपवनसंरक्षक सतत चुकीची माहिती देऊन लोकांची तसेच न्यायालयाची दिशाभूल करीत आहेत. या विरोधात सतत आवाज उठवला, पण त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळेच आज हे उपोषण करीत आहे, असे जयंत बरेगार यांनी स्पष्ट केले. उपोषणस्थळी सकाळी उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी भेट दिली. मात्र बरेगार यांनी केलेली मागणी आपण पूर्ण करू शकत नाही. तसेच हा विषय जिल्हाधिकारी यांच्या अख्यत्यारीत येत आहे, असे सांगितले.बरेगार यांनी उच्च न्यायालयाचा अवमान झाला आहे. त्यामुळे तुम्ही फक्त अवमान याचिका केव्हा करणार हे आम्हाला लेखी द्या, अशी मागणी केली. पण यावर कोणताही तोडगा निघाला नाही. उपवनसंरक्षक समाधान चव्हाण हे ओरोस येथे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या बैठकीसाठी गेले होते ते रात्री उशिरा सावंतवाडीत दाखल झाले त्यानंतर चव्हाण यानी बरेगार याच्याशी सविस्तर चर्चा केली यात अवमान याचिकेचा विषय हा जिल्हाधिकारी याच्या संर्दभा येतो त्यामुळे तेथे बैठक घेउन याचिका दाखल करण्याबाबत निर्णय घेउ असे सागत उपोषण करण्या बाबत विनती केली तसे लेखी पत्र ही बरेगार याना उपवनसंरक्षक यानी दिले त्यानंत बरेगार यानी आपले उपोषण मागे घेतले यावेळी कुडाळ व सावंतवाडी वनक्षेत्रपाल तसेच वन कर्मचारी उपस्थीत होते.लेखापालना लवकरच कार्यमुक्त करणार!बैठकस्थळी जयंत बरेगार यांनी लेखापाल संजय आंबेराय यांची बदली झाली, मग एक महिना त्यांना येथे का ठेवले, असा सवाल केला. त्यावर आपण त्यांना लवकरच सोडणार आहे, असे सांगितले. तसेच या मागण्या मान्य करा, मला लेखी द्या, मग मी माझे उपोषण मागे घेतो, असेही बरेगार यांनी चर्चेवेळी चव्हाण यांना सुनावले.