शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

जांभवडे ग्रामस्थांचे उपोषण

By admin | Updated: October 18, 2016 00:51 IST

बीएसएनएलच्या समस्या : योग्य सुविधा देण्याची मागणी

 कुडाळ : जांभवडे गावातील बीएसएनएलच्या नेटवर्कमध्ये लवकरात लवकर सुधारणा व्हावी व नवीन लँडलाईन जोडण्या तत्काळ पूर्ण व्हाव्यात यासह इतर मागण्यांसाठी जांभवडे येथील ग्रामस्थांनी कुडाळच्या बीएसएनएल कार्यालयासमोर उपोषण केले. यावेळी ग्रामस्थांनी सांगितले की, जांभवडे येथे बीएसएनएलचा टॉवर आहे. पण या गावातील भगवती मंदिराच्या पलिकडे या टॉवरचे नेटवर्क मिळत नाही. तसेच दूरध्वनीही लागत नाहीत. त्यामुळे येथील मोबाईलधारकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे येथे लँडलाईन सेवा मिळण्याकरिता येथील ग्रामस्थांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता बीएसएनएलकडे केली आहे. तरीही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे या विभागाच्या कारभाराविरोधात उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. त्यानंतर अधिकारी पाहणीसाठी जांभवडे येथे गेले होते. मात्र, कोणतीच सुधारणा झाली नाही, असाही आरोप येथील ग्रामस्थांनी करीत सोमवारी कुडाळ येथील बीएसएनएलच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या कल्पिता मुंज, आबा मुंज, उपसरपंच चिंतामणी मडव, डॉ. प्रशांत मडव, अ‍ॅड. विशाल मडव, बाळकृष्ण मडव, अजिंक्य जांभवडेकर, कृष्णा पेडणेकर, अमित मडव, अक्षय माळकर उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी उपोषणककर्त्यांची भेट घेतली (प्रतिनिधी) तीन आठवड्यात योग्य निर्णय घ्या उपोषणकर्त्यांना अधिकाऱ्यांनी भेट देत चर्चा केली. यावेळी त्यांनी जीपीआरएस व नेटवर्कचे प्रश्न तत्काळ सुटावेत, अशी मागणी केली. तसेच ग्राहकांचा संतापही आपल्या कारभाराने वाढत असल्याचे सांगितले. यावेळी अधिकाऱ्यांना उपोषणकर्त्यांनी तीन आठवड्यात येथील दूरध्वनी सेवांबाबत असलेल्या तक्रारींचे निवारण करून योग्य सुविधा पुरवा, असे सांगत उपोषण स्थगित केले.