‘जैतापूर’ रद्द करुन दाखवाच : यशवंतराव

By Admin | Updated: August 7, 2014 00:28 IST2014-08-06T21:24:10+5:302014-08-07T00:28:43+5:30

राष्ट्रवादीचे युवक उपाध्यक्ष

'Jaitapur' should be canceled: Yashwantrao | ‘जैतापूर’ रद्द करुन दाखवाच : यशवंतराव

‘जैतापूर’ रद्द करुन दाखवाच : यशवंतराव

राजापूर : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे राज्यासह देशाचा विजेचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. अगोदर असणारा बहुतांश प्रकल्पग्रस्तांचा विरोध आता मावळला आहे. मात्र, शिवसेनेचे या भागातील काहीजण या प्रकल्पाविषयी जनतेमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम करत आहेत. ते खरोखरच तसे करणार असतील तर त्यांनी हा प्रकल्प रद्द करुन दाखवावाच, असे आव्हान राष्ट्रवादीचे युवक उपाध्यक्ष अजित यशवंतराव यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिले.
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. त्यांनी हा प्रकल्प रद्द करून दाखवावाच, असे खुले आव्हान त्यांनी दिले. गेल्या दहा वर्षांच्या काळात आघाडी शासनाने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यात अपयश आल्याने निवडणुकीत आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचे त्यांनी सांगितले.
या भागाचा विकास होण्यासाठी दर्जेदार शिक्षणासह सुसज्ज आरोग्य यंत्रणा व रोजगार येथे उपलब्ध करुन दिला पाहिजे, असेही यशवंतराव यांनी यावेळी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: 'Jaitapur' should be canceled: Yashwantrao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.