शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

भास्कर जाधवांचे चिपळूणमधील प्रकार उघडकीस आणायला वेळ लागणार नाही, भाजप तालुकाध्यक्षाने दिला इशारा

By सुधीर राणे | Updated: October 19, 2022 13:47 IST

भास्कर जाधव हे, मी उद्धव ठाकरेंचा समर्थक आहे असे आता सांगत आहेत. मात्र, त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना ज्या शिव्या घातलेल्या त्याची क्लिप आमच्याकडे आहे.

कणकवली: केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्यांच्या कुटुंबावर आमदार भास्कर जाधव यांनी केलेले आरोप खोटे असून आम्ही भाजपाच्यावतीने त्याचा निषेध करतो. तसेच जाधव यांनी चिपळूण मध्ये आतापर्यंत केलेले प्रकार उघडकीस आणण्यास आम्हाला वेळ लागणार नाही. यापुढे राणेंच्या विरोधात ते बोलतील तर जिल्ह्याच्या सीमेवर खारेपाटण मध्ये ते येताच त्यांचा 'करेक्ट' कार्यक्रम होईल. असा इशारा कणकवली भाजप तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांनी दिला आहे.कणकवली येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रवींद्र उर्फ बाळा जठार,भाजप युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदीप मेस्त्री, संदीप सावंत, उमेश घाडीगावकर, लक्ष्मण घाडीगावकर आदी उपस्थित होते.संतोष कानडे म्हणाले, भास्कर जाधव यांनी अनेक कृत्ये केली आहेत. त्यांनी आपल्या कार्यालयात इम्तियाज मुकादम या व्यक्तीला बोलावून मारहाण केली. तसेच एका पत्रकाराला इमारतीच्या पहिल्या माळ्यावरून खाली ढकलले आहे. आता शिवसेनेचे नेते म्हणून ते मिरवत आहेत. हिंदू धर्माचे आराध्य दैवत असलेल्या शारदा देवीच्या मंदिरामध्ये त्यांनी लोकांना शिवीगाळ केली होती. आता नारायण राणेंवर शिवराळ भाषेत टीका करीत आहेत. त्यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कोकणामध्ये भरपूर काही केलेले आहे. मात्र, शरद पवार यांनी जाधव यांना नऊ खात्याचा मंत्री केल्यानंतर त्यामाध्यमातून किती फायदा चिपळूणला मिळवून दिला ते त्यांनी सांगावे.उद्धव ठाकरेंना शिव्या घातलेली आमच्याकडे क्लिपजाधव हे, मी उद्धव ठाकरेंचा समर्थक आहे असे आता सांगत आहेत. मात्र, २०१४ साली शिवसेनेची पहिली आमदार पदासाठी यादी जाहीर झाली, त्यात त्यांचे नाव नव्हते. त्यावेळी त्यांनी गाडीत बसून उद्धव ठाकरे यांना ज्या शिव्या घातलेल्या आहेत त्याची क्लिप पण आमच्याकडे आहे. त्यांनी त्यावेळी चिपळूणमध्ये येऊन आपल्या कार्यकर्त्याना सांगितले होते की, उद्धव ठाकरे यांनी माझ्याकडे निवडणूकीत उमेदवारी देण्यासाठी दोन कोटी रुपये मागितले होते. असा गौप्यस्फोटही केला.त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईलआमच्या नेत्यांवर टीका करणारा माणूस जिल्ह्यात येत असेल तर त्याला सीमेवरतीच त्याची जागा दाखवण्याची तयारी आम्ही केलेली आहे. त्यामुळे भास्कर जाधव हे यापुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्यानंतर त्यांना त्यांच्याच भाषेत योग्य उत्तर दिले जाईल असेही संतोष कानडे म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBhaskar Jadhavभास्कर जाधवBJPभाजपाShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण