शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

वैभववाडी पंचायत समितीत खड्ड्यांचा मुद्दा गाजला, लोकमतच्या बातमीचा संदर्भ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 15:00 IST

वैभववाडी तालुक्यातील रस्त्याच्या खड्डयांचा मुद्दा पंचायत समितीच्या सभेत चांगलाच गाजला. लोकमतच्या वृत्ताचा उल्लेख करुन वैभववाडी-फोंडा रस्त्याच्या दुरवस्थेमुळे हैराण झालेले लोक दुरुस्ती परवडत नसल्याने वाहने विकून टाकण्याच्या मनस्थितीत असल्याचे सदस्य मंगेश लोके यांनी सभागृहात सांगितले.

ठळक मुद्देवैभववाडी पंचायत समितीत खड्ड्यांचा मुद्दा गाजलालोकमतच्या बातमीचा संदर्भ : अवजड वाहतुकीचा जामदा पुलास धोका

वैभववाडी : तालुक्यातील रस्त्याच्या खड्डयांचा मुद्दा पंचायत समितीच्या सभेत चांगलाच गाजला. लोकमतच्या वृत्ताचा उल्लेख करुन वैभववाडी-फोंडा रस्त्याच्या दुरवस्थेमुळे हैराण झालेले लोक दुरुस्ती परवडत नसल्याने वाहने विकून टाकण्याच्या मनस्थितीत असल्याचे सदस्य मंगेश लोके यांनी सभागृहात सांगितले.

तर महामार्ग चौपदरीकरणाच्या अवजड वाहतुकीमुळे खारेपाटण तिथवली रस्ता खचत चालला असून जामदापूल कोसळण्याची भीती उपसभापती हर्षदा हरयाण यांनी व्यक्त केली आहे.सभापती लक्ष्मण रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभा झाली. सभेला उपसभापती हर्षदा हरयाण, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, सहाय्यक गटविकास अधिकारी शशिकांत भरसट, सदस्य अरविंद रावराणे, मंगेश लोके, अक्षता डाफळे व खातेप्रमुख उपस्थित होते.तोच धागा पकडून उपसभापती हर्षदा हरयाण यांनी महामार्ग चौपदरीकरणाचे ठेकेदार ह्यकेसीसी बिल्डकॉनह्ण कंपनीची क्रशर तिथवलीत असल्याने अवजड वाहतुकीमुळे खारेपाटणपर्यंत ठिकठिकाणी रस्ता खचला असून जामदापूल कोसळण्याची भीती व्यक्त केली.

त्यावेळी रस्त्याच्या दुरवस्थेची कबुली देत पाऊस थांबताच खड्डे भरण्याचे तर केसीसी बिल्डकॉनच्या अवजड वाहतुकीबाबत वरिष्ठांमार्फत महामार्ग ठेकेदार कंपनीशी पत्रव्यवहार करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकामचे उपविभागीय अधिकारी पी.जी. तावडे यांनी दिले. त्यावेळी खड्डे दगड-मातीऐवजी पावसाळी डांबराने भरण्याची सूचना सभापती रावराणे यांनी केली.लोक वाहने विकून टाकण्याच्या मनस्थितीतखड्डयांमुळे वाहन चालकांना करावी लागणारी कसरत आणि जनतेला होणाऱ्या त्रासाबाबतचे वैभववाडी-फोंडा मार्ग खड्डयात हरवला असे वृत्त लोकमतने शुक्रवारी प्रसिद्ध केले. या वृत्ताचा सभागृहात उल्लेख करुन सदस्य लोके यांनी बांधकामचे उपविभागीय अधिकारी तावडे यांना विचारणा केली. खड्डयांमुळे वाहनांचे नुकसान होत असून दुरुस्ती परवडत नसल्याने लोक वाहने विकून टाकण्याच्या मनस्थितीत असल्याचे सांगितले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गroad safetyरस्ते सुरक्षाpanchayat samitiपंचायत समिती