शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

Sindhudurg: कलमठ ग्रामपंचायतीला 'आयएसओ' मानांकन; विकास प्रक्रियेला गती येणार

By सुधीर राणे | Published: March 12, 2024 4:42 PM

कणकवली : कणकवली तालुक्यातील अनेक पुरस्कारांनी सन्मानित कलमठ  ग्रामपंचायतीला 'आयएसओ' मानांकन मिळाले आहे. त्यामुळे गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा ...

कणकवली: कणकवली तालुक्यातील अनेक पुरस्कारांनी सन्मानित कलमठ  ग्रामपंचायतीला 'आयएसओ' मानांकन मिळाले आहे. त्यामुळे गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. 'आयएसओ'मुळे ग्रामपंचायतीचा प्रशासकीय कारभार आणि गावाचा विकास गतिमान होणार आहे.शासननियुक्त संस्थेमार्फत अनेक ग्रामपंचायतींची 'आयएसओ' मानांकनासाठी तपासणी झाली होती. त्यामध्ये सुसज्ज इमारत, अद्ययावत कार्यालय,स्वच्छता, मालमत्तेचे विवरण, दैनंदिन  लेखे, भौतिक सुविधा अशा विविध बाबी तपासण्यात आल्या होत्या. मंगळवारी कलमठ ग्रामपंचायत कार्यालयात आयएसओ मानांकन  प्रमाणपत्र संस्थेचे सहदेव चव्हाण यांच्या हस्ते कलमठ ग्रामपंचायतीला प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.ग्रामपंचायत कामात सुसूत्रता, कार्यालय दफ्तर वर्गीकरण, सर्व समित्या, कर्मचारी  काम वर्गवारी, पार्किंग, शासनाच्या योजना माहिती, दिशादर्शक, नामफलक अशा अनेक बाबींच्या पूर्तता करून ग्रामपंचायत स्थापने पासूनचे ५० वर्षाचे सर्व रेकॉर्ड अपडेट करण्यात आले असून त्या रेकॉर्डचे विलगीकरण करणे या सर्व बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. यासाठी गेले सहा महिने ग्रामपंचायत  काम करत होती. ग्रामपंचायतीच्या सर्व टीमच्या मेहनतीने हे शक्य झाले असून या पुढे गावातील सर्व शाळा व अंगणवाड्या आयएसओ करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे पंचायत समितीचे माजी उपसभापती संदिप मेस्त्री यांनी यावेळी सांगितले. ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.यावेळी पंचायत समितीचे  माजी उपसभापती मिलिंद मेस्त्री, माजी पंचायत समिती सदस्य महेश लाड, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, ग्राम विकास अधिकारी प्रवीण कुडतरकर, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र यादव, नितीन पवार, दिनेश गोठणकर, श्रेयस चिंदरकर, अनुप वारंग, सुप्रिया मेस्त्री, स्वाती नारकर, प्रिती मेस्त्री, हेलन कांबळे, नजराना शेख आदी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गgram panchayatग्राम पंचायतKankavliकणकवली