शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

लोखंडी सापळा कोसळला, महामार्ग चौपदरीकरणाचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 11:37 IST

तळेरे येथे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील पुलाचे काम सुरू असताना गुरुवारी दुपारी अचानक पुलाचा तयार करीत असलेला लोखंडी सळ्यांचा सापळा खाली पडला. त्याखाली काम करीत असलेले तीन कामगार त्यात सापडले. त्यामध्ये त्यांना किरकोळ दुखापत झाली असून अधिक उपचारासाठी त्यांना कणकवली येथील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

ठळक मुद्दे लोखंडी सापळा कोसळला, महामार्ग चौपदरीकरणाचे काम तळेरेतील घटनेत तिघे जखमी

तळेरे : तळेरे येथे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील पुलाचे काम सुरू असताना गुरुवारी दुपारी अचानक पुलाचा तयार करीत असलेला लोखंडी सळ्यांचा सापळा खाली पडला. त्याखाली काम करीत असलेले तीन कामगार त्यात सापडले. त्यामध्ये त्यांना किरकोळ दुखापत झाली असून अधिक उपचारासाठी त्यांना कणकवली येथील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.तळेरे एसटी स्थानकासमोर महामार्गाच्या पुलाचे काम सुरू आहे. या कामासाठी पाया टाकून झाला असून त्यावरील काम करण्यासाठी कंपनीचे कामगार स्टील बांधून त्याचा सापळा तयार करीत होते. या दरम्यान अचानक संपूर्ण सापळा खाली पडला. त्यावेळी खाली काम करीत असलेले तीन कामगार त्याखाली सापडले. कित्येक टनाच्या असलेल्या त्या सापळ्याखाली सापडूनही हे कामगार किरकोळ जखमी झाले.

ही घटना घडताच घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी जमली. खाली सापडलेल्या त्या तिघांना इतर कामगारांनी बाहेर काढले आणि ताबडतोब अधिक उपचारासाठी कणकवली येथे घेऊन गेले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.विशेष म्हणजे जिथे हा अपघात घडला त्याठिकाणी कोणीही इंजिनिअर अथवा अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे या कामाच्या बेफिकिरीपणाबद्दल ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू होती. यातील जखमींची नावे मिळू शकलेली नाही. 

टॅग्स :Accidentअपघातhighwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग