शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

"जलसंधारणच्या कामांची सखोल चौकशी करा, ठराविक ठेकेदारांची दादागिरी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 14:27 IST

राज्यात दरवर्षी १० ते १२ हजार कोटी जलसंधारण कामांसाठी खर्च होतात.

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलसंधारण विभागामध्ये ठेकेदारांची प्रचंड दादागिरी चालली आहे. याकामांमध्ये मोठी साखळी कार्यरत असून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळे याला जबाबदार असणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण तक्रार करणार आहोत. तसेच त्या कामांची सखोल चौकशी करत कारवाई करावी अशी मागणी करणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली. भाजप कार्यालय येथे आज, शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.राजन तेली म्हणाले, राज्यात दरवर्षी १० ते १२ हजार कोटी जलसंधारण कामांसाठी खर्च होतात. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५ नव्याने निविदा निघाल्या होत्या. ३००-३५० कोटी रुपयांचे प्रकल्प होत आहेत. जलसंधारण विभागात स्वतःचे वर्चस्व निर्माण करीत काही ठेकेदार काम करतात. धरण बांधतात, पण तेथील भूसंपादन होत नाही. शेतकऱ्यांना जमिनीचे पैसे मिळत नाहीत. हा सरकारी म्हणजेच जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे.सावडाव येथे २०१० साली धरण झाले. आता त्याची  दुरुस्ती केली जात आहे. करंजे, कुंभवडे, वर्दे, आंब्रड, शिरवल या धरण प्रकल्पांचे काम सुरू असले तरी तेथील  भूसंपादन आजही झालेले नाही. याला जबाबदार कोण? जलसंधारणची कामे होतात, मात्र, त्यांचे ऑडिट झाले पाहिजे अशी मागणीही करणार असल्याचे तेली यांनी सांगितले.वैभववाडी तालुक्यातील नाधवडे व अन्य धरण प्रकल्प आहेत.त्या तालुक्यात अजून ५-६ प्रकल्प होत आहेत. त्यांचा काय उपयोग ? त्यामुळे पैशाची लयलूट थांबली पाहिजे.गरज नसलेल्या ठिकाणीही ठेकेदार कामे काढतात.याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही तेली म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प