शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

सावंतवाडी नगराध्यक्षांच्या खुर्चीचा अपमान: शिवसेनेच्या नगरसेवकांकडून घटनेचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 8:43 PM

येत्या काही महिन्यांत नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे सावंतवाडीतील जनता नगराध्यक्षपदी कोणाची निवड करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ठळक मुद्देसावंतवाडी नगरपालिकेतील प्रकार

सावंतवाडी : सावंतवाडीचे तत्कालीन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदावर प्रभारी नगराध्यक्षा म्हणून अन्नपूर्णा कोरगावकर यांनी कार्यभार स्वीकारला. त्यानंतर नगराध्यक्षांची खुर्ची तेथून हलवून इतरत्र ठेवली, असा आरोप सावंतवाडी नगरपालिकेच्या ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी केला आहे. जोपर्यंत नगराध्यक्षांची खुर्ची होती त्या जागेवर ठेवली जात नाही तोपर्यंत आम्ही नगराध्यक्षांच्या केबिनमध्ये पाय ठेवणार नाही, असा इशारा लोबो यांनी दिला आहे. तसेच याबाबत आम्ही मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचीही भेट घेणार असल्याचे नगरसेवक आनंद नेवगी यांनी स्पष्ट केले आहे.

सावंतवाडीच्या ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी शनिवारी येथील पालिका सभागृहात विकासकामांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी नगरसेवक बाबू कुडतरकर, आनंद नेवगी, सुरेंद्र बांदेकर, नगरसेविका भारती मोरे, शुभांगी सुकी आदी उपस्थित होते.

नगरसेविका लोबो म्हणाल्या, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने बहुतांशी विकासकामांबाबत कोणतीही माहिती घेतली नव्हती. मात्र, गेले दोन दिवस आम्ही सर्व विकासकामांची माहिती घेत असून, अनेक कामे प्रगतीपथावर आहेत.तसेच संत गाडगेबाबा भाजी मंडईचे कामही लवकरात लवकर सुरू करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. आम्ही सावंतवाडीवासीयांना विकासाचे दिलेले आश्वासन पूर्ण करणार आहोत, असेही लोबो यांनी सांगितले.

सावंतवाडीचे तत्कालीन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा मंजूरही झाला आहे. त्यामुळे प्रभारी नगराध्यक्षा म्हणून उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर या काम पहात आहेत. त्यांना आमचा अजिबात विरोध नाही. पण त्यांनी काम करीत असताना काही मूल्यांची जपणूक करणे बंधनकारक आहे. त्यांनी नगराध्यक्षांची जी खुर्ची होती ती काढून टाकणे योग्य नाही. आम्ही त्यांना सांगितले की तुम्ही त्या खुर्चीच्या बाजूला खुर्ची लावून काम करा. पण त्यांनी तसे न करता ती खुर्ची बाजूला केली हे कितपत योग्य आहे?

मी स्वत: तसेच प्रशासनाच्यावतीने मुख्याधिकारी यांनीही त्यांना याची कल्पना दिली होती. असे असताना त्यांनी तो मान राखला नाही, असा आरोपही लोबो यांनी केला असून, या घटनेनंतर आम्ही नगराध्यक्षांच्या केबिनमध्ये पाय ठेवला नसून, ज्यावेळी ती खुर्ची होती त्या जागेवर ठेवली जाईल तेव्हाच पाय ठेवू असेही लोबो यांनी सांगितले. तसेच या विषयावर आम्ही सोमवारी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांची भेट घेणार असून, ती खुर्ची होती त्याठिकाणी ठेवण्यास सांगणार असल्याचे नगरसेवक आनंद नेवगी यांनी सांगितले.

सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी राजीनामा देऊन विधानसभा निवडणूक लढविली. त्यांनी राजीनामादिल्याने नगराध्यक्ष पद रिक्त झाले आहे. येत्या काही महिन्यांत नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे सावंतवाडीतील जनता नगराध्यक्षपदी कोणाची निवड करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.दोन खुर्च्यांमुळे अडथळा होत होतानगराध्यक्षांच्या खुर्चीचा मी कोणताही अवमान केला नाही. फक्त नगराध्यक्षांच्या खुर्चीच्या बाजूला खुर्ची लावल्यामुळे मला फोन घेता येत नव्हता. तसेच बेल मारता येत नव्हती. यामुळेच ती खुर्ची बाजूच्या केबिनमध्ये ठेवली आहे.त्याचे एवढे राजकारण होईल, असे मला वाटले नव्हते, असे मत प्रभारी नगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMuncipal Corporationनगर पालिका