इन्सुलीत कारच्या धडकेत
By Admin | Updated: April 20, 2016 23:20 IST2016-04-20T23:20:00+5:302016-04-20T23:20:00+5:30
दोघे जखमी

इन्सुलीत कारच्या धडकेत
बांदा : मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली खामदेव नाका येथे मोटार व दुचाकीमध्ये अपघात झाला. या अपघातात दोघांना गंभीर दुखापत झाली असून, जखमींवर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून अधिक उपचारांसाठी बांबोळी, गोवा येथे हलविले. हा अपघात बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास झाला.
महामार्गावरील इन्सुली खामदेव नाका येथे झारापहून गोव्याच्या दिशेने जाणारी मोटार (केए २२ पी ७०४९) खामदेव नाका येथे आली असता इन्सुलीहून मडुराच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला तिने (एमएच ०७ एन २२४५) धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, दुचाकीच्या मागे बसलेली व्यक्ती दुचाकीवरून मोटारीवर येऊन पडली. तर कारचालक रस्त्यावर आदळला. यात बाळकृ ष्ण महादेव म्हापसेकर व यशवंत केशव म्हापसेकर (रा. ओटवणे-मांडवफातरवाडी) हे दोघेही गंभीर जखमी झाले. जखमींना स्थानिकांच्या मदतीने १०८ रुग्णवाहिकेने प्राथमिक उपचारासाठी बांदा येथे हलविण्यात आले. तेथून अधिक उपचारांसाठी गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले. याबाबतची नोंद बांदा पोलिसांत करण्यात आली. (प्रतिनिधी)