शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

ज्याच्या विरोधात तक्रार त्यांनाच चौकशी करण्याच्या दिल्या सूचना, राज्य महिला आयोगाच्या अजब कारभाराने संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 18:46 IST

ओरोस : वित्त विभागाशी कोणतीही चर्चा न करता आपल्याला परस्पर कार्यमुक्त करून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपल्यावर ...

ओरोस : वित्त विभागाशी कोणतीही चर्चा न करता आपल्याला परस्पर कार्यमुक्त करून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपल्यावर अन्याय केला असल्याची तक्रार अन्यायग्रस्त अधिकाऱ्याने राज्य महिला आयोगाकडे केली आहे. मात्र याबाबत राज्य महिला आयोगाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे आदेश देणे अपेक्षित असताना महिला आयोगाने सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाच याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे पत्र काढले आहे. ज्याच्या विरोधात तक्रार त्यांनाच चौकशी करण्याच्या सूचना आयोगाने दिल्याने आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत संभ्रम आहे.सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजश्री पाटील यांना सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी २ मे २०२५ रोजीच्या आदेशान्वये परस्पर कार्यमुक्त केले आहे. मुळात महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील अधिकाऱ्यांना शासन वित्त विभागाच्या मान्यतेशिवाय परस्पर कार्यमुक्त करता येत नसल्याचा ८ फेब्रुवारी, २०१८ चा शासन निर्णय आहे.

मात्र असे असतानाही त्यांनी याबाबत कोणतीही उचित कार्यवाही न करता राजश्री पाटील यांनी परस्पर कार्यमुक्त केले आहे. याबाबत आपल्यावर अन्याय झाल्याची तक्रार राजश्री पाटील यांनी राज्य महिला आयोगाकडे केली होती. मात्र महिला आयोगाने या तक्रारीची गंभीर अशी दखल घेतली नसल्याचे दिसून येत आहे.

....न्याय कसा मिळेल ?एखाद्या अधिकाऱ्यांच्या विरोधात  महिला अधिकारी राज्य महिला आयोगाकडे तक्रार करतात आणि आयोग पुन्हा त्याच अधिकाऱ्याला चौकशी करण्यास मागत असल्याचे तक्रारदारांना न्याय कसा मिळेल ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गWomenमहिलाGovernmentसरकार