शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रातील अजैविक कचऱ्याचा समुद्री जिवांना मोठा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 17:05 IST

Malvan beach Tourisam sindhudurg- पर्यटकांची सर्वाधिक पसंती असलेल्या मालवण किनारपट्टीवर अजैविक कचऱ्याची प्रचंड समस्या जाणवत आहे. गेल्या काही वर्षात मालवणच्या समुद्रात मोठ्या प्रमाणात विघटन न होणारा कचरा सापडून येत आहे.

ठळक मुद्देनौकांमध्ये अपघाताची शक्यता स्थानिक तरुणांनी कचऱ्याचे ढीग काढले समुद्राबाहेर

मालवण : पर्यटकांची सर्वाधिक पसंती असलेल्या मालवण किनारपट्टीवर अजैविक कचऱ्याची प्रचंड समस्या जाणवत आहे. गेल्या काही वर्षात मालवणच्या समुद्रात मोठ्या प्रमाणात विघटन न होणारा कचरा सापडून येत आहे.यात मोठ्या प्रमाणावर तुटलेली जाळी, प्लास्टिक बाटल्या, पिशव्या यांचा समावेश आहे. समुद्रातील या अजैविक प्रदूषणाचा फटका समुद्री जिवांना बसत आहे. मासेमारी किंवा पर्यटन नौकांच्या पंख्यामध्ये कचरा अडकण्याची दाट शक्यता असल्याने किनारपट्टीवर अपघाताचे धोकेही वाढले आहेत.मालवण चिवला किनारपट्टीवर गेले काही दिवस समुद्रातील अजैविक कचरा सातत्याने किनाऱ्यावर वाहून येत होता. या पार्श्वभूमीवर मालवण चिवला बीच येथील तरुणांनी पुढाकार घेत समुद्रात स्वच्छता मोहीम राबविली.

यात मोठ्या प्रमाणात कचरा गोळा करून किनाऱ्यावर आणण्यात आला आहे. या मोहिमेत स्वीटन रोज, जॉन्सन रोड्रिक्स, शुभम मुळेकर, राकेश वेंगुर्लेकर, पार्थ परब, गणपत मयेकर, फ्रान्सिस फर्नांडिस, जॉन्सन फर्नांडिस, मनोज मेतर आदी पर्यटन व्यावसायिक सहभागी झाले होते.मालवण किनारपट्टीवरील सर्वात सुरक्षित बीच म्हणून चिवला बीच ओळखला जातो. याठिकाणी चालणाऱ्या जलक्रीडा प्रकारांचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे दाखल होतात. बोटिंग, पॅरासिलिंगदरम्यान नौकांच्या पंख्यामध्ये जाळी अडकण्याचा धोका लक्षात घेता, पर्यटकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने खबरदारी म्हणून समुद्री स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्याचे पर्यटन व्यावसायिकांकडून सांगण्यात आले.कचऱ्याचे साम्राज्यमालवणच्या सागरी पर्यटन सफरीवर येणारे पर्यटक पाणी व खाद्यपदार्थ खाऊन रिकाम्या बाटल्या, प्लास्टिक वेष्टणे किनाऱ्यावर तसेच समुद्राच्या पाण्यात टाकतात. त्यासोबतच तुटलेली जाळी समुद्रात तरंगत असतात. अशाप्रकारच्या सातत्याने येणाऱ्या अजैविक कचऱ्यातून समुद्रात मोठ्या प्रमाणात विघटनशील नसलेल्या कचऱ्याचे साम्राज्य तयार होते. 

टॅग्स :Malvan beachमालवण समुद्र किनाराsindhudurgसिंधुदुर्गenvironmentपर्यावरणtourismपर्यटन