शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
3
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
4
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
5
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
6
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
7
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
8
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
9
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
10
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल
11
Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!
12
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
13
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
14
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
15
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
16
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
17
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
18
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
19
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
20
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर

सावंतवाडीतील जखमी बेकरी व्यावसायिकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 15:41 IST

रस्त्यावरील गतिरोधकांचा अंदाज न आल्याने पत्रादेवी-बांदा सीमेवर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले सावंतवाडी येथील प्रसिद्ध बेकरी व्यावसायिक केरोबिन डिसोझा (६०) यांचे सोमवारी सकाळी गोवा येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.

ठळक मुद्देसावंतवाडीतील जखमी बेकरी व्यावसायिकाचा मृत्यूपत्रादेवी-बांदा सीमेवर अपघात

सावंतवाडी : रस्त्यावरील गतिरोधकांचा अंदाज न आल्याने पत्रादेवी-बांदा सीमेवर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले सावंतवाडी येथील प्रसिद्ध बेकरी व्यावसायिक केरोबिन डिसोझा (६०) यांचे सोमवारी सकाळी गोवा येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.केरोबिन हे गोव्यातील नातेवाईकाचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी एकटेच दुचाकीने गेले होते. नातेवाईकांना भेटून सावंतवाडीकडे परतत असताना सायंकाळी ४ वाजता पत्रादेवी-बांदा रस्त्यावरील गतिरोधकांचा अंदाज न आल्याने त्यांच्या दुचाकीला अपघात झाला होता. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले होते. उपचारांना त्यांनी काहीसा प्रतिसाद दिला होता. मात्र, सोमवारी सकाळी त्यांची प्रकृती गंभीर बनली आणि त्यातच त्यांचे निधन झाले.केरोबिन यांचा सावंतवाडीत गेल्या अनेक वर्षांपासून बेकरी व्यवसाय आहे. केरोबिन पाव म्हणून त्यांच्या पावाला पसंती होती. येथील मच्छिमार्केट रस्त्यावर सिमॉन बेकरीच्या माध्यमातून ते व्यवसाय करीत होते.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, जावई, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे. त्यांचा मृतदेह दुपारी सावंतवाडीत आणण्यात आला. यावेळी सावंतवाडी शहरातील नागरिकांनी गर्दी केली होती.

कोकिसरेतील महिलेचा कणकवलीत मृत्यूकणकवली : वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे-कुंभारवाडी येथील सविता सोनाजी खेडेकर (३५) यांना अत्यवस्थ स्थितीत उपचारासाठी सोमवारी सायंकाळी कणकवली उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांना दोन दिवसांपूर्वी ताप येत होता.कोकिसरे-कुंभारवाडी येथील सविता खेडेकर यांना दोन दिवसांपूर्वी ताप येत होता. त्यांच्यावर वैभववाडी येथील खासगी रूग्णालयात उपचार करण्यात आले होते. सोमवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास त्यांना उपचारासाठी वैभववाडी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.तेथून अधिक उपचारासाठी सायंकाळी कणकवली उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपजिल्हा रूग्णालयात दाखल करीत असताना त्यांची प्रकृती गंभीर झाली. सायंकाळी ४.५० वाजता त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा रक्त नमुना तपासणी अहवाल लेप्टो निगेटिव्ह आला होता. सविता खेडेकर यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्ग