शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत नव्या राजकीय समीकरणांचा 'उदय', राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या

By सुधीर राणे | Updated: September 27, 2022 16:44 IST

कणकवली नगरपंचायतची थेट नगराध्यक्ष निवडणूक असून, या निवडणुकीच्या निमित्ताने ही नवीन राजकीय समीकरणे जुळवली जात असल्याची चर्चा.

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेल्या आणि  राजकारणात नेहमीच लक्षवेधी ठरलेल्या कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीला आता अवघे काहीच महिने शिल्लक राहिले आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात नवीन राजकीय समीकरणांचा उदय होवू  लागला आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू उद्योजक किरण सामंत आणि भाजपचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे एकत्रित छायाचित्र फलकावर पाहायला मिळाल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या.उद्योजक किरण सामंत यांच्या समृद्धी फाउंडेशनचे लॉन्चिंग कणकवली पटकीदेवी मित्र मंडळाच्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने कणकवली येथे प्रत्यक्ष कार्यक्रमा दरम्यान झाले. यादरम्यान, किरण सामंत व भाजपचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे एकत्रित छायाचित्र फलकावर पाहायला मिळाले. समृद्धी फाउंडेशनच्या निमित्ताने कणकवली शहराच्या “समृद्धी” चा हा नवीन “पॅटर्न” कणकवलीत नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने जनतेसमोर आला आहे.पटकीदेवी कला- क्रीडा मंडळाच्यावतीने दरवर्षीच नवरात्र उत्सवाचे आयोजन केले जाते. याकरिता दरवर्षी समीर नलावडे मित्र मंडळाचे मोठे योगदान असते. मात्र, यावर्षी या कार्यक्रमांमध्ये बदललेल्या राजकीय समीकरणांचे बदल दिसू लागले आहेत. पटकीदेवी येथे यंदा नवरात्र उत्सव समिती गठीत करण्यात आली असून, या समितीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना स्थान देण्यात आले आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने बॅनरचे केलेले प्रवेशद्वार यावर देखील नवीन राजकीय समीकरणे जोडलेली पाहायला मिळत आहेत.बॅनरच्या गेटवर एका बाजूला समीर नलावडे तर दुसरीकडे उद्योजक किरण सामंत यांचे फोटो एकत्र झळकल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. स्वागताच्या फलकामध्ये राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, उद्योजक किरण उर्फ भैया सामंत तर भाजपचे आमदार नितेश राणे व नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे एकाच फलकावर एकत्रित लागलेली छायाचित्रे भविष्यातील राजकीय समीकरणांची झलक दाखवून देणारे ठरत आहेत.कणकवली नगरपंचायतची थेट नगराध्यक्ष निवडणूक असून, या निवडणुकीच्या निमित्ताने ही नवीन राजकीय समीकरणे जुळवली जात असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान यावर्षी पटकी देवीकडील नवरात्र उत्सवाचे आयोजक म्हणून समीर नलावडे मित्र मंडळ व समृद्धी फाउंडेशन यांच्या वतीने एकत्रित भव्य दिव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने जुळलेल्या राजकीय समिकरणांची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliticsराजकारणUday Samantउदय सामंतBJPभाजपा