औद्योगिक उपक्रमांसाठी सप्ताह १ ते ६ डिसेंबर कालावधी :
By Admin | Updated: November 22, 2014 00:14 IST2014-11-21T22:40:16+5:302014-11-22T00:14:09+5:30
जिल्हा उद्योग केंद्रातर्फे आयोजन

औद्योगिक उपक्रमांसाठी सप्ताह १ ते ६ डिसेंबर कालावधी :
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील उत्पादन-सेवा सुरु केलेल्या औद्योगिक उपक्रमांची वास्तविक संख्या समजून येत नाही. उत्पादन-सेवा सुरु केलेल्या ज्या औद्योगिक उपक्रमांनी अद्याप कोणत्याही प्रकारची ज्ञापन स्वीकृती घेतलेली नाही अशा उपक्रमांना थेट भाग २ ज्ञापन स्वीकृती देता येते. अशा पात्र औद्योगिक उपक्रमांसाठी भाग २ ज्ञापन स्वीकृती देण्यासाठी १ ते ६ डिसेंबर या कालावधीत विशेष सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उत्पादन-सेवा सुरु केलेल्या पात्र औद्योगिक उपक्रमांना भाग २ ज्ञापन स्वीकृतीचे अर्ज भरून घेऊन नवीन भाग २ ज्ञापन स्वीकृती देण्यात येईल. ज्या उद्योगांकडे यापूर्वी जिल्हा उद्योगकेंद्र, सिंधुदुर्ग कार्यालयाकडील स्थायी लघु उद्योग नोंदणी आहे. परंतु भाग २ ज्ञापन स्वीकृती घेतलेली नाही अशा उद्योगानाही भाग २ ज्ञापन स्वीकृती देण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या उत्पादन करणाऱ्या, सेवा देणाऱ्या औद्योगिक उपक्रमांनी अद्याप भाग २ ज्ञापन स्वीकृती घेतलेली नाही. त्यांनी कारखान्याचे, सेवा उद्योगाचे नेमके ठिकाण (घर क्रमांक, गाळा क्रमांक, जागेचा सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर) पत्रव्यवहाराचा पत्ता व संपर्क क्रमांक, उपक्रमाची घटना भागीदारी, सहकारी संस्था या स्वरूपाची असल्यास एका विश्वस्ताच्या नावे, संचालकाचे नावे सही करण्यासाठी प्राधिकार पत्र, ठराव, उपक्रमाचे मालक, संचालक, भागीदार, विश्वस्त यांचा बायोडेटा, जमीन, इमारत, यंत्रसामुग्री, उपकरणे व अन्य स्थिर मालमत्ता यामधील गुंतवणूक रक्कम. उपक्रमातील कामगारांची संख्या (व्यवस्थापकीय, पर्यवेक्षकीय, कामगार, स्त्री व पुरुष या वर्गवारीसह) जोडलेला वीज पुरवठा (एच. पी.) उत्पादन क्षमता, यंत्रसामुग्री बसविल्याचा महिना व वर्ष, उत्पादन सुरु केल्याची तारीख आदी माहिती जिल्हा उद्योगकेंद्र सिंधुदुर्ग कार्यालय, मुख्य प्रशासकीय इमारत, सिंधुदुर्गनगरी येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योगकेंद्र यांनी केले आहे. भाग २ ज्ञापन स्वीकृतीसाठी आवश्यक अर्जाचा नमुना या कार्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच ज्या औद्योगिक उपक्रमांना या सप्ताहामध्ये अर्ज सादर करणे शक्य होणार नाही अशा औद्योगिक उपक्रमांना या सप्ताहामध्ये अर्ज सादर करणे शक्य होणार नाही अशा औद्योगिक उपक्रमांनी कोणत्याही अन्य कामाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधावा, असेही महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योगकेंद्र यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी) ज्ञापन स्वीकृतीसाठी अर्जाचे आवाहन सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम विकास कायदा २००६ मधील तरतुदीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने स्थापन होणाऱ्या तसेच स्थापित असलेल्या (उत्पादन-सेवा सुरु केलेल्या) सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांना जिल्हा उद्योगकेंद्राकडून उत्पादन व सेवा यापैकी अनुज्ञेय अनुक्रमे भाग १ अथवा भाग २ ज्ञापन स्वीकृती देण्यात येते. अनेक औद्योगिक उपक्रम उत्पादन सुरु करण्यापूर्वी भाग १ ज्ञापन स्वीकृती घेतात. परंतु उत्पादन-सेवा सुरु झाल्यानंतर भाग २ ज्ञापन स्वीकृतीसाठी अर्ज सादर करीत नाहीत. त्यामुळे या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त उद्योजकांनी या सप्ताहामध्ये आवश्यक त्या कागदपत्रांसह सर्व नोंदी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.