शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील पहिली पाणबुडी वेंगुर्लेत, सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 03:45 IST

सिंधुुदुर्ग जिल्ह्यातील सागरी विश्व पर्यटकांना उपलब्ध करून देणे तसेच पाणबुडीद्वारे होणारे समुद्र पर्यटन जागतिक दर्जाचे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यातून वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक आणि परिसरासाठी भारतातील पहिली पाणबुडी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सिंधुदुर्ग - सिंधुुदुर्ग जिल्ह्यातील सागरी विश्व पर्यटकांना उपलब्ध करून देणे तसेच पाणबुडीद्वारे होणारे समुद्र पर्यटन जागतिक दर्जाचे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यातून वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक आणि परिसरासाठी भारतातील पहिली पाणबुडी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही पाणबुडी बॅटरीच्या आधारावर चालणार आहे. त्यामुळे समुद्री पर्यटन वाढीस चालना मिळणार आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात याबाबतची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.युती शासनाच्या काळात अर्थसंकल्पात सर्वाधिक निधीची तरतूद यावेळी झाल्याचे दिसून आले आहे. कोकणातील गडकिल्ले संवर्धनातून पर्यटन विकास साधण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून करण्यात आला असून कोकणातील खार बंधाºयांच्या बांधकामासाठी विशेष कार्यक्रम राबविणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आहे. अस्तित्वात असणाºया खार बंधाºयांच्या दुरूस्तीसाठी ६० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. कोकणातील समुद्र किनाºयांच्या संवर्धनासाठी व जमिनीची धूप थांबविण्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने मोठा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी व उद्योजक यांना विशेष प्रोत्साहन देण्यात येणार असून त्यासाठी १०० कोटी रूपयांची तरतूद केली आहे.किनारपट्टीवरील बंदरांमध्ये प्रवासी जलवाहतुकीसाठी पायाभूत सुविधांच्या २२ कोटी ३९ लाख इतक्या खर्चाच्या ११ प्रकल्पांना सागरमाला कार्यक्रमाअंतर्गत मान्यता देण्यात आली आहे. निसर्ग पर्यटन विकासासाठी अर्थात इको टूरिझम कार्यक्रमासाठी १२० कोटी रूपयांची तरतूद आहे. शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळातर्फे २५ कोटी रूपयांचे अतिरिक्त भाग भांडवल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे.एकीकडे स्वागत, दुसरीकडे टीकाराज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पावर कोकणची पूर्णपणे छाप दिसून आली आहे. विविध विषयांवर कोट्यवधी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे कोकणातील जनतेला खुश करण्याचा प्रयत्न यातून दिसत आहे. असे असले तरी राज्याच्या तिजोरीत खडखडात असताना कोट्यवधींचा निधी कसा काय देणार? अशा तिखट प्रतिक्रिया विरोधकांमधून उपस्थित होत आहेत. सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाºयांनी अर्थसंकल्पाचे स्वागतच केले असले तरी विरोधी पक्षातील पदाधिकाºयांनी अर्थसंकल्प अतिशय फसवा असल्याचे सांगितले.सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी १0 कोटीसंग्रहालय पाहण्यासाठी देशातून आणि परदेशातून येणाºया पर्यटकांसाठी स्मरणवस्तू विक्री केंद्राची (सर्व्हेनिअर शॉप) निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी ७ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. संरक्षित किल्ल्यांचे त्रिमित मानचित्रण (थ्रीडी मॅपींग) करण्यात येणार आहे. यासाठीही भरीव निधीची तरतूद असून सिंधुदुर्ग जिल्ह्याला ३५0 वर्षे पूर्ण झाल्याने या ऐतिहासीक वास्तूच्या जतन आणि संवर्धनासाठी १0 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.काथ्या उद्योगातून रोजगारनिर्मितीकाथ्या उद्योगाच्या माध्यमातून रोजगार संधी उपलब्ध करत महिलांच्या सबलीकरणाच्यादृष्टीने शाश्वत व पर्यावरणपूरक काथ्याच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी १0 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. सागरी क्षेत्रातील विकासकामांचे नियमन व तटीय क्षेत्रातील लोकांची पारंपरिक उपजीविका वाढविणे व क्षेत्र व्यवस्थापन या प्रकल्पासाठी ९ कोटी ४0 लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.कातळ शिल्पे;२४ कोटीगणपतीपुळे पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी ७९ कोटींचा आराखडा मंजूर असून त्यासाठी २0 कोटी रूपयांच्या निधीची तरतूद केली आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील माचाळ येथे नवीन पर्यटन स्थळ विकसीत करण्यात येणार आहे. सागरी पर्यटनाबरोबरच कातळशिल्पांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी २४ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.मच्छिंद्र कांबळी, मंगेश पाडगावकर स्मारकासाठी निधीमालवणी भाषा सातासमुद्रापलिकडे नेणारे नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांचे सिंधुदुर्ग आणि कविश्रेष्ठ मंगेश पाडगावकर यांचे वेंगुर्ले येथे स्मारक उभारणीसाठी भरीव निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.कोकणला झुकते मापशासनाच्या अर्थसंकल्पात कोकणला झुकते माप देण्यात आले आहे. कोकणच्या विकासासाठी पूरक अशा योजना अर्थसंकल्पातून देण्यात आल्या असून, भरघोस निधी मिळणार आहे. पाटबंधारे प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न दिसत आहे.-बबन साळगावकर, नगराध्यक्ष, सावंतवाडीफक्त घोषणाराज्यामध्ये विकास दर मोठ्या प्रमाणात घटला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात घोषणा करून काय उपयोग. आज झालेल्या अर्थसंकल्पातून नवीन काही देण्यात आले नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प फसवा आहे. कोकणातील जनतेला काहीच मिळाले नाही फक्त घोषणा करण्यात आल्या आहेत. जर तिजोरीत पैसेच नाही तर विकास कसा करणार?-संजू परब, तालुकाध्यक्ष, स्वाभिमान,सावंतवाडीकोकण हिताचा नाहीजुन्या बाटलीतील नवीन दारू असेच या अर्थसंकल्पाचे वर्णन करावे लागेल. नवीन काही नाही. महानगरपालिकांचे हित बघितले, पण नगरपालिकांना निधी नाही, मग विकास कसा करायचा? फक्त घोषणा करण्यापलीकडे या अर्थसंकल्पात काही दिसत नाही. त्यामुळे हा कोकणच्या हिताचा अर्थसंकल्प नाही.-अ‍ॅड. परिमल नाईक, नगरसेवक, सावंतवाडीअर्थसंकल्प फसवाकाँग्रेसच्या काळात अर्थसंकल्पात भरीव असे काम दिसत होते. पण युतीने मांडलेला अर्थसंकल्प एका घटकांसाठीच असल्याचे दिसून येत आहे. मोठ्या घोषणा केल्या, पण प्रत्यक्षात निधी कसा येणार हे सांगितले नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प फसवा आहे.- राजू मसूरकर, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMaharashtra Budget 2018महाराष्ट्र अर्थसंकल्प २०१८