वाढीव घरपट्टी विरोधात आंदोलन करणार

By Admin | Updated: August 2, 2015 20:46 IST2015-08-02T20:46:57+5:302015-08-02T20:46:57+5:30

कुडाळ राष्ट्रवादी काँग्रेसचा ठराव : जनतेसाठी बुरे दिन आणण्याचा निर्णय

Increasingly, the movement against the house-building will be organized | वाढीव घरपट्टी विरोधात आंदोलन करणार

वाढीव घरपट्टी विरोधात आंदोलन करणार

कुडाळ : युती शासनाने घरपट्टी वाढीव करण्याचा निर्णय म्हणजे जनतेसाठी ‘अच्छे दिन’ नाही, तर ‘बुरे दिन’ आणणारा निर्णय आहे. वाढीव घरपट्टी आकारून जनतेवर अन्याय होणार असल्याने या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी पक्ष आंदोलन छेडणार, असा निर्णय कुडाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. कुडाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक कुडाळ तालुका खरेदी-विक्री संघाच्या कै. शिवरामभाऊ जाधव सभागृहात तालुकाध्यक्ष दादा बेळणेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉन्टस, कार्याध्यक्ष प्रसाद रेगे, प्रदेश सरचिटणीस अमित सामंत, विधान सभा अध्यक्ष बाळ कनयाळकर, भास्कर परब, साबा पाटकर, नाझीर शेख, वसंत दळवी, प्रसाद राऊळ, महिला अध्यक्षा पूनम सावंत, राधिका परब, लालू पटेल, वैभव साटम, सचिन पाटकर, सावळाराम अणावकर, बाळा पवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यासभेत वाढीव घरपट्टीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यानुसार युती शासनाने मूल्याधारीत वाढीव घरपट्टी करण्याच्या निर्णयासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. यापूर्वी घरपट्टी ही ग्रामीण शहर भागातील घरपट्टी क्षेत्रफळानुसार आकारली जात होती. आताच्या युती सरकारने घरपट्टीच्या निकषात बदल करून घरपट्टी वाढीव करण्याचा घाट घातला आहे. यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियमन २०१५ अशी अधिसूचना काढली आहे. यामुळे झोपडी किंवा मातीच्या घरासाठी सध्या जी घरपट्टी भरावी लागते, तिच्या दहापट घरपट्टी भरावी लागणार आहे. त्यामुळे या करवाढीने सामान्य जनता होरपळून निघणार आहे. या निर्णयासंदर्भात हरकती घेण्याकरिता शासनाने वेळ देणे आवश्यक असताना हरकतींसाठी ५ आॅगस्टपर्यंतचीच मुदत दिली आहे. सरकारने हरकती घेण्यासाठीचाही कालावधी अल्प दिल्याने याबाबत संपूर्ण ग्रामीण भागापर्यंत माहिती नाही. त्यामुळे या हरकती कागदावरच राहणार असून, शासन निर्णय मंजूर झाल्यास जनतेला मोठा हादरा बसणार आहे. युती शासनाने काढलेला हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. याबाबत जनतेवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस आंदोलनाचा मार्ग अवलंबणार असून जनतेवर अन्याय होऊ देणार नाही, असा निर्णय या सभेत घेण्यात आला. (प्रतिनिधी)


संघटनावाढीसाठी तालुक्यात कार्यक्रम
कुडाळ तालुक्यात राष्ट्रवादी संघटनावाढीसाठी कुडाळ तालुक्याचे सर्व पदाधिकारी संपूर्ण कुडाळ तालुक्याचा दौरा करणार असून, त्यात जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पक्षाचे मेळावे आयोजित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

Web Title: Increasingly, the movement against the house-building will be organized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.