शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीय वस्त्यांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 16:04 IST

CoronaVirus Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागासवर्गीय वस्त्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी सदस्य अजिंक्य पाताडे यांनी सभेत केली. दरम्यान, याकडे जिल्हा परिषद अध्यक्षा व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे लक्ष वेधा, असे आदेश सभापती अंकुश जाधव यांनी दिले. तसेच या विभागाचा ऑक्टोबरमध्ये १०० टक्के खर्च होईल, असे नियोजन करण्याची सूचनाही त्यांनी केली.

ठळक मुद्देमागासवर्गीय वस्त्यांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव समाजकल्याण समिती सभा : लक्ष देण्याची सदस्य अजिंक्य पाताडे यांची मागणी

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागासवर्गीय वस्त्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी सदस्य अजिंक्य पाताडे यांनी सभेत केली. दरम्यान, याकडे जिल्हा परिषद अध्यक्षा व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे लक्ष वेधा, असे आदेश सभापती अंकुश जाधव यांनी दिले. तसेच या विभागाचा ऑक्टोबरमध्ये १०० टक्के खर्च होईल, असे नियोजन करण्याची सूचनाही त्यांनी केली.जिल्हा परिषद समाज कल्याण समिती सभापती अंकुश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने सभा संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा समाजकल्याण अधिकारी शाम चव्हाण, सदस्य अजिंक्य पाताडे, मानसी जाधव, राजलक्ष्मी डीचवलकर, संजय पडते, अधिकारी आदी उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. यात जास्तकरून मागासवर्गीय वस्त्यांमध्ये हे रुग्ण आढळून येत असल्याचे मालवण सभापती अजिंक्य पाताडे यांनी सांगत याकडे लक्ष वेधले. यावर उपाययोजना करण्याची मागणी सभेत केली. तसेच या वस्त्यांमध्ये कोरोना आजारावर जनजागृती करण्याची सूचना केली. याकडे जिल्हा परिषद अध्यक्षा व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे लक्ष वेधून ठोस पावले उचलण्यात यावी, अशी सूचना सभापती अंकुश जाधव यांनी सभेत केली.अपंग कल्याण निधी १०० टक्के खर्च झाला पाहिजेसमाजकल्याण विभागाच्या २० टक्के सेस व ५ टक्के अपंग कल्याण निधीअंतर्गत येणाऱ्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. तसेच आणखी प्रस्ताव मागविण्याची सूचना सभापती जाधव यांनी केली. दरम्यान, या विभागाचा निधी ऑक्टोबर २०२१पर्यंत १०० टक्के खर्च झाला पाहिजे. त्यानुसार नियोजन करा, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.दिव्यांगांना स्वयंचलित वाहनांचा लाभ द्याअपंग कल्याणअंतर्गत दिव्यांगांना स्वयंचलित वाहन (मोटारसायकल) देण्यात येते. याचा काहींना लाभ मिळाला आहे, तर काहींना अद्याप मिळाला नाही. त्यांचे फोन आपल्याला येत आहेत. त्यामुळे उर्वरित दिव्यांगांना स्वयंचलित वाहनांचा त्वरित लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करा, असे आदेश सभापती अंकुश जाधव यांनी दिले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धांचे निकाल त्वरित जाहीर करण्याची सूचना केली.

टॅग्स :zpजिल्हा परिषदsindhudurgसिंधुदुर्ग