शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आंगणेवाडीतील श्री भराडी देवी एसटी महामंडळास पावली; मालवण, कुडाळ आगारास झाला 'इतक्या' लाखांचा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 17:45 IST

चालक, वाहकांनी अहोरात्र मेहनत घेतल्यामुळे एसटी बस सेवा सुरळीत

मालवण  : श्री आंगणेवाडी श्री भराडी देवी यात्रा मार्गावर मालवण आगारातून ४५ एसटी बसच्या माध्यमातून विविध गावांतून दोन दिवस सतत फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. यातून मालवण आगारास ७ लाख २५ हजार ४४ रुपये उत्पन्न मिळाले आहे. अशी माहिती आगार व्यवस्थापक सचेतन बोवलेकर यांनी सोमवारी दिली आहे.जादा वाहतुकीच्या माध्यमातून मालवण आगाराकडून १२ हजार १७८ किमी चालवून त्यातून ७ लाख २५ हजार ४४ रुपये उत्पन्न मिळाले. ५९.५४ पैसे प्रति किमी उत्पन्न व ९३.३६ एवढे भारमान मिळाले.विभाग नियंत्रक प्रशांत वासकर व विभागीय वाहतूक अधिकारी विक्रम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या जादा गाड्या व फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले. यात्रा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी चालक, वाहक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. चालक, वाहकांनी अहोरात्र मेहनत घेतल्यामुळे एसटी बस सुरळीत सेवा देवू शकल्याचे ते म्हणाले.यात्रा कालावधीत कोणतीही रा. प. बस मार्गस्थ बिघाड न झाल्याने यांत्रिक कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.  यात्रा मार्गावर २७ हजार ३२१ भाविकांनी बस वाहतुकीचा लाभ घेतला. त्याबद्दल आगार व्यवस्थापक सचेतन बोवलेकर यांनी आभार मानले आहेत.कुडाळ आगाराला साडेपाच लाखांचे उत्पन्नकुडाळ आगारामार्फत तालुक्यातील विविध गावांतून २७ गाड्या आंगणेवाडीसाठी धावल्या. जादा वाहतुकीच्या माध्यमातून कुडाळ आगाराकडून ८ हजार १६ किमी चालवून त्यातून ५ लाख ६८ हजार ५७९ रुपये उत्पन्नातून ७०.३० प्रती किमी उत्पन्न आणि ११६:१२ एवढे भारमान मिळाले.आंगणेवाडीमध्ये विशेष बससेवेसाठी ४ बसेस त्यातून उत्पादित किमी ५१४ व अनुत्पादित किमी ६८६ चालविण्यात आले. यामधून ६६ हजार रुपये उत्पन्न मिळाले. प्रती किमी ५५ उत्पन्न व ९९.०४ एवढे भारमान मिळाले. भाविकांसाठी एकूण २३ एसटी बसचा वापर करून ११० बसफेऱ्या सोडण्यात आल्या. यामधून ५ लाख २५७९ एवढे उत्पन्न  कुडाळ आगारास प्राप्त झाले, तर प्रती किमी ७३.७ एवढे उत्पन्न व १२०.७१ भारमान मिळाले.यासाठी एकूण २७ चालक व २३ वाहक असे एकूण ५० कर्मचारी यांचा वापर करण्यात आला.  यात्रा विभाग नियंत्रक प्रशांत सुभाष वासकर व विभागीय वाहतूक अधिकारी विक्रम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग