शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

आंबोली घाटातील घटना, दारू वाहतूक करणाऱ्या कारचा पाठलाग, चालकाचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 18:58 IST

राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या इन्सुली तपासणी नाक्याचे निरीक्षक शंकर जाधव यांनी आपल्या पथकासह आंबोली घाटातील पूर्वीचा वस याठिकाणी थरारक पाठलाग करुन  बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्या कारवर कारवाई करीत ३ लाख १६ हजार ५६० रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या दारुसह एकूण ११ लाख १६ हजार ५६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

ठळक मुद्देआंबोली घाटातील घटना, दारू वाहतूक करणाऱ्या कारचा पाठलागचालकाचे पलायन११ लाखांचा मुद्देमाल जप्त

बांदा : राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या इन्सुली तपासणी नाक्याचे निरीक्षक शंकर जाधव यांनी आपल्या पथकासह आंबोली घाटातील पूर्वीचा वस याठिकाणी थरारक पाठलाग करुन  बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्या कारवर कारवाई करीत ३ लाख १६ हजार ५६० रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या दारुसह एकूण ११ लाख १६ हजार ५६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. थरारक पाठलाग करताना कारचालकाने कार चौकुळ येथे निर्जनस्थळी टाकून अंधाराचा फायदा घेत पलायन केले. ही कारवाई शनिवारी रात्री उशिरा करण्यात आली.याबाबत अधिक माहिती अशी की, गोवा येथून आंबोलीच्या घाटातून कोल्हापूर येथे विनापरवाना गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक होणार असल्याची पक्की माहिती राज्य उत्पादन शुल्क खात्याचे इन्सुुली तपासणी नाक्याचे निरीक्षक शंकर जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या पथकातील सहकारी सहाय्यक दुय्यम निरीक्षक चंद्रकांत कदम, एस. एस. कदम, शरद साळुंखे, आर. डी. ठाकूर यांच्यासह आंबोली घाटातील पूर्वीचा वस याठिकाणी सापळा रचला होता.शनिवार रात्री १० वाजण्याच्या सुमारास गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी कार (एम.एच. 0७, एस ४५९९) थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र कारचालकाने कार न थांबविता भरधाव वेगात घाटातून कोल्हापूरच्या दिशेने पलायन केले. निरीक्षक शंकर जाधव यांनीदेखील आंबोली घाटात कारचा थरारक पाठलाग केला.

कारचालकाने कार चौकुळच्या दिशेने मार्गस्थ केली. पथकाने पाठलाग न सोडल्याने कारचालकाने चौकुळ येथे एका निर्जन स्थळी कार उभी करुन तेथून जंगलात पलायन केले. कारच्या  डिकीची तपासणी केली असता  गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे बॉक्स आढळले.पथकाने ३ लाख १६ हजार ५६० रुपये किमतीचे ४० बॉक्स व ८ लाख रुपये किमतीची कार असा एकूण ११ लाख १६ हजार ५६० रुपये किमतीचा मुद्येमाल जप्त केला. व अज्ञात कार चालकाविरोधात मुंबई दारुबंदी कायद्याअन्वये गुन्हा दाखल केला.  

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गliquor banदारूबंदी