शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कारकुनाच्या अंगावर खाजकुहिली टाकण्याची घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 19:18 IST

devgad tahshil sindhudurg- देवगड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील अव्वल कारकून शिवराज चव्हाण यांच्या अंगावर अज्ञात व्यक्तीने खाजकुहिली टाकण्याची घटना गुरुवारी दुपारी १२.४५ वा सुमारास घडली. या घटनेने महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून, देवगड तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे. हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीने सराईतपणे व पूर्वनियोजन करून हे कृत्य केले असून, संबंधितांवर कारवाई व्हावी यासाठी पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

ठळक मुद्देकारकुनाच्या अंगावर खाजकुहिली टाकण्याची घटना देवगड येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागामध्ये घडला प्रकार
देवगड : देवगड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील अव्वल कारकून शिवराज चव्हाण यांच्या अंगावर अज्ञात व्यक्तीने खाजकुहिली टाकण्याची घटना गुरुवारी दुपारी १२.४५ वा सुमारास घडली. या घटनेने महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून, देवगड तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे. हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीने सराईतपणे व पूर्वनियोजन करून हे कृत्य केले असून, संबंधितांवर कारवाई व्हावी यासाठी पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.गुरुवारी देवगड तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणात वर्दळ होती. दरम्यान, पुरवठा विभागात अव्वल कारकून म्हणून कार्यरत असलेल्या शिवराज चव्हाण यांच्या टेबलाजवळ आलेल्या अज्ञात व्यक्तींनी ते आपल्या कामात व्यस्त असतानाच पिशवीतून आणलेली खाजकुहिली त्यांची मान खाली असतानाच त्यांचा अंगावर टाकून तेथून पळ काढला.दरम्यान, खाजकुहिली टाकून पसार झालेल्या त्या व्यक्तीचा तहसील कार्यालयात कामानिमित्त आलेले भाजप तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, आबा तावडे व इतरांनी पाठलाग केला; मात्र, त्या व्यक्तीने देवगड दूरसंचार कार्यालय असलेल्या मार्गाने पळ काढला. तो सापडला नाही. त्यावेळी पुरवठा विभागात कर्मचाऱ्यांसहीत अनेक नागरिक कामानिमित्त उपस्थित होते.चव्हाण यांच्या अंगावर टाकलेल्या खाजकुहिलीचा त्रास त्यांच्याबरोबरच पुरवठा विभागातील इतर कर्मचारी व नागरिक यांनाही झाला. घडलेला प्रकार चव्हाण यांनी तत्काळ उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या निदर्शनास आणून दिला.प्रशासनात खळबळ अज्ञात व्यक्तीने कर्मचाऱ्याच्या अंगावर खाजकुहिली टाकण्याचा देवगड तालुक्यातील हा पहिलाच प्रकार असून यामुळे महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे. दरम्यान, सीसीटीव्ही यंत्रणा बसविली नसल्याने त्याचाच फायदा अज्ञात व्यक्तीने घेतला. हे कृत्य करणारी व्यक्ती सराईत गुन्हेगार असून कोणाच्या तरी सांगण्यावरून पूर्वनियोजन करून तिने हे कृत्य केले असावे, असा संशय चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
टॅग्स :Devgad Police Stationदेवगड पोलिस स्टेशनsindhudurgसिंधुदुर्गTahasildarतहसीलदार